गर्भादानापासून बाळ होण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया दाखवणार्‍या तमिळनाडूतील वरमूर्तीस्वर मंदिरातील कलाकृती !

तमिळनाडूतील ६ सहस्र वर्षांपूर्वीच्या वरमूर्तीस्वर मंदिरात गर्भादान (फर्टिलायझेशन), गर्भधारणा होणे, ९ मासांच्या गर्भावस्था, नैसर्गिकरित्या बाळ होणे, सिझर (बाळ होण्याची शस्त्रक्रिया) करून बाळ होणे, एवढेच नव्हे, तर काही दिवसांचा गर्भ सिद्ध करून तो दुसर्‍या ठिकाणी ठेवण्यासाठी काढणे (सरोगसी) आदी सर्व गोष्टी दगडात अतिशय सुस्पष्टपणे कोरलेल्या आहेत.

१. पुरुष बीज (शुक्राणू) आणि स्त्री बीज (अंडाणू) यांचा संयोग दर्शवणार्‍या आकृत्या दगडात कोरल्या आहेत. या गोष्टी केवळ ४०० वर्षांपूर्वी शोधलेल्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहाणे शक्य आहे, त्या गोष्टी आणि त्याची प्रक्रिया दगडात कोरली जाते, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे !

२. गर्भ सिद्ध होण्यापूर्वी कोषिकांचे २, ४, ८, १६  असे विभाजन होऊन नंतर पिंड बनते आणि हळूहळू मानवी आकार प्राप्त होतो, पुढे भ्रूण अन् नाळ बनते. या सर्व अवस्था या दगडांमध्ये कोरलेल्या आहेत.

३. एवढेच नव्हे, तर गर्भाच्या प्रत्येक मासातील अवस्थाही दगडात कोरलेल्या आहेत. अशा गोष्टी स्कॅनर किंवा एक्सरे सारख्या आधुनिक यंत्रातून दिसू शकतात. गर्भावस्थेतील बाळाची वाढ कशी होते, याची इत्यंभूत माहिती त्यांना होती. ती त्यांनी यंत्राद्वारे पाहिली असेल कि त्यांच्याकडे ते पहाण्याची सूक्ष्म दृष्टी होती ?

याचाच अर्थ तत्कालीन स्थापत्यकारांजवळ ते ज्ञान होते. वेद आणि अन्य प्राचीन हिंदु ग्रंथात मानवी शरीरशास्त्राचे सर्व सखोल ज्ञान होते.

४. श्रीकृष्णाचा जन्म नैसर्गिकरित्या न होता आधुनिक विज्ञानात ज्याला ‘सिझेरियन’ (सी सेक्शन) म्हणतात, त्याप्रमाणे पोटाची शस्त्रक्रिया करून झाला होता. म्हणून आजही श्रीकृष्णाच्या जन्मगावात जन्माष्टमीच्या दिवशी काकडी (खीरा)मधून बाळकृष्णाला बाहेर काढून वस्त्र घालण्याची प्रथा आहे. अनेक देवळांतील मूर्तींमध्ये श्रीकृष्णाच्या आईच्या पोटावर या शस्त्रक्रियेनंतर असणारे व्रण दाखवले जातात. यावरून प्राचीन काळी पोटातून बाळ बाहेर काढण्याची  शल्यचिकित्सा होत होती, हे लक्षात येते.

(पानावरील सर्व संदर्भ : प्रवीण मोहन यांच्या चित्रफिती आणि विविध संकेतस्थळे)