कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नवी मुंबईत वीज नाही !

महावितरण

नवी मुंबई – येथील महावितरणाच्या कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी भागात गेल्या काही घंट्यांपासून वीज गेली आहे. विजेच्या मागणीचा भार आल्याने तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे आणि नवी मुंबईत सध्या ४००० सहस्र मेगा वॅटची मागणी आहे.