सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामनवमीच्या निमित्ताने कोल्हापूर येथे रामराज्य संकल्प यज्ञ !

रामराज्याच्या स्थापनेसाठी साकडे !

कोल्हापूर, १७ एप्रिल (वार्ता.) – सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामनवमीच्या निमित्ताने १६ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध मार्गांवरून दुचाकी फेरी काढण्यात आली. यात सनातन संस्थेच्या वतीने शाहूपुरी येथील ४ थ्या गल्लीत सनातनच्या सेवाकेंद्रासमोर वाहनफेरीचे औक्षण करण्यात आले.

१७ एप्रिलला श्रीरामनवमीच्या निमित्ताने दसरा चौक येथे रामराज्य संकल्प यज्ञ पार पडला.

दसरा चौक येथे आयोजित करण्यात आलेला संकल्प यज्ञ आणि सहभागी हिंदुत्वनिष्ठ

या यज्ञात हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रीतम आणि सौ. प्रीती पवार यांच्यासह अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. अमर जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. गणेश अतिग्रे आणि श्री. सूरज पाटील, इस्कॉनचे श्री. दीपक सपाटे हे सर्वजण सहभागी होते. यज्ञानंतर दुपारी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी श्रीरामाचा पाळणा म्हटला.

श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेली दुचाकी फेरी

१. सायंकाळी ५ वाजता हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी महिलांसाठी कुंकूमार्चन केले आणि नंतर महाआरती घेण्यात आली.

२. हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने फुलेवाडी, शिरोली, उंचगाव, चंबुखडी शाखांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली, तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला. शहर, तसेच फुलेवाडी येथील मिरवणुकीत हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी सहभागी झाले होते.

शाहूपुरी येथे सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रसमोर फेरीचे औक्षण करतांना सौ. रोहिणी लुकतुके

३. या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, सर्वश्री निरंजन शिंदे, सोहम कुराडे, संग्राम निकम, योगेश कारेकर, अभिजित पाटील यांसह अन्य सहभागी झाले होते.

४. शहरात विविध श्रीराम मंदिरांमध्ये श्रीरामनवमी असंख्य भक्तांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून श्रीरामाचा पाळणा म्हणण्यात आला.