Shri Krishna Janmabhoomi Case : श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी होणार !

सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाची याचिका फेटाळली

नवी देहली – मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीची सर्व प्रकरणे अलाहाबाद उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याच्या विरोधात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने मुसलमान पक्षाच्या मागण्या फेटाळून लावल्या. त्यामुळे या याचिकांची एकत्रित सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित मथुरा जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेले १५ खटले उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचा आदेश दिला होता. ही सर्व प्रकरणे एकाच प्रकारची असून त्यात एकाच प्रकारच्या पुराव्यांच्या आधारे निर्णय घ्यावा लागेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाचा वेळ वाचवण्यासाठी या सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी व्हायला हवी.