काठमांडू – भारताने नुकतेच नेपाळमधील विविध संस्थांना ३५ रुग्णवाहिका आणि ६६ स्कूल बस भेट दिल्या. नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी नेपाळ सरकारचे अर्थमंत्री वर्षमान पुन यांच्या उपस्थितीत अधिकार्यांना रुग्णवाहिका आणि स्कूल बस यांच्या चाव्या सुपुर्द केल्या. भारतीय राजदूत श्रीवास्तव यांनी सांगितले की, ही भेट भारताच्या दीर्घकालीन उपक्रमाचा भाग आहे आणि ही कृती दोन्ही देशांमधील सखोल भागीदारी अधोरेखित करते. अत्यावश्यक सेवांमध्ये अधिक चांगल्या सुविधांद्वारे विकासाला चालना देणे आणि द्विपक्षीय संबंध बळकट करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
नेपाळचे अर्थमंत्री वर्षमान पुन यांनी नेपाळमध्ये भारत सरकारच्या सहकार्याने चालू असलेल्या विकास प्रकल्पांचे कौतुक केले. यामुळे दोन्ही देशांतील लोकांमधील संबंध अधिक दृढ होतील, असे ते म्हणाले.