नुकताच मुसलमानांचा रमझान महिना संपून ईद झाली. नेहमीप्रमाणे मुसलमानांचे रोजे (उपवास) पार पडले. अशा वेळी धर्मशिक्षणाअभावी एखाद्या हिंदूने रोजे पाळले, तर त्याची बातमी प्रसिद्ध होणे, यात काही नवल नाही; मात्र हीच बातमी जेव्हा वेगळ्या तर्हेने म्हणजे तथाकथित धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक सलोखा, एकात्मतेचा संदेश या नावाखाली प्रसिद्ध केली जाते, तेव्हा हिंदूंच्या मनात संभ्रम निर्माण होत असतो. हिंदूंमध्ये त्यांच्याच धर्माविषयी विकल्प निर्माण करून त्यांना दुबळे करायचे, हाच हेतू साध्य करण्याचा पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांचा डाव हिंदूंच्या लक्षात येईल, तो सुदिन समजायला हवा !
१. रवि रमेश पवार याने रोजे पाळल्याविषयी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील मासळी विक्रेता रवि रमेश पवार या ३० वर्षांच्या हिंदु तरुणाने त्याच्या मुसलमान मित्रांसह रमझान महिन्याचे सर्व ३० रोजे पूर्ण केले. रवि हा मुसलमान मासळी विक्रेत्यांसमवेत काम करून स्वत:ची उपजीविका चालवतो. अनेक वर्षे तो मुसलमानांसमवेत राहिल्याने त्याला रमझान महिना आणि रोजे यांविषयी कुतूहल होते. त्यामुळे रविने ठाम निर्धार करून हे रोजे पूर्ण केले. त्याचे हे रोजे पाळण्यामध्ये त्याच्या समवेतच्या मुसलमान तरुणांनीही त्याला सहकार्य केले होते. तो पहाटे मुसलमानांसमवेत जेवायचा आणि सायंकाळी त्यांच्याच बरोबर ‘इफ्तार’ करून रोजा सोडायचा. रोजा ठेवूनही तो भर उन्हात मासळी व्यवसायावर सहकार्यांसोबत काम करायचा. एवढे करूनच नव्हे, तर त्यानंतर रविने ईदही साजरी करण्याचा मनोदयही व्यक्त केला. रोजे पूर्ण केल्यानंतर रवि म्हणतो, ‘‘रमझानचे रोजे ठेवणे, हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. माझ्या मुसलमान मित्रांनीही आपल्या घरचा सदस्य म्हणून अत्यंत आपुलकीची वागणूक दिली. कधीही कोणताही भेदभाव नव्हता. महिनाभर रोजे ठेवल्यानंतर अत्यंत हलकेफुलके आणि प्रसन्न वाटत आहे.’’
२. स्वधर्मशिक्षण जाणून उपवास केल्यास हिंदूंना चिरंतन आनंद मिळेल !
धर्मशिक्षण नसल्याने हिंदू कसे दिशाहीन झाले आहेत ? याचे हे चालते-बोलते उदाहरण आहे. मुसलमानांचे रोजे, तर हिंदूंचे उपवास असतात. अनेक वेळा बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केलल्या टीकांमुळे हिंदूंना आपल्याच अनेक देवतांचे महत्त्व लक्षात आलेले नाही. त्यामुळे हिंदु धर्मातील कोणती उपासना केल्यानंतर कसा लाभ होतो ? हेही त्यांना समजत नाही. श्रावण मास, चतुर्थी, नवरात्र, आषाढी-कार्तिकी एकादशी, १६ सोमवार व्रत अशा विविध वेळी करण्यात येणार्या उपवासांचेही महत्त्व समजून घेतल्यास केवळ हलकेफुलके होण्याऐवजी खरा चिरंतन आनंदही अनुभवता येईल, तसेच देवतांचे आशीर्वादही लाभतील, अशी व्यवस्था हिंदु धर्मामध्ये आहेच ना ?
३. आज रोजे, उद्या धर्मांतर आणि नंतर आत्मघात व्हायला नको !
‘हिंदु आणि मुसलमान समाजातील १०० वर्षांचा शांततेचा करार केवळ कोकणातच झाला आहे’, अशी फसवी विधाने केली जातात. असे लिखाण वाचून हिंदूंनी भुलण्यापेक्षा मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार, तलवारीच्या बळावर केलेले त्यांचे धर्मांतर, प्रतिदिन वेगवेगळ्या जिहादांच्या माध्यमांतून केली जात असलेली घोर फसवणूक अन् करण्यात येत असलेला नरसंहार, मुसलमानेतरांना ‘काफिर’ संबोधून त्यांना संपवायचे, ही शिकवण हिंदूंनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. हिंदूंनी हे लक्षात घ्यायला हवे की, आज केलेले रोजे सर्वधर्मसमभावाचे प्रदर्शन उद्या धर्मांतर आणि नंतर आत्मघात होऊ शकतो. इतकेच नव्हे, तर स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे ‘धर्मांतरामुळे एक हिंदु कमी झाला यापेक्षा हिंदूंचा एक शत्रू वाढला’, हे वाक्य लक्षात घ्यायला हवे. सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीपणा यांच्या नावाखाली हिंदूंचा पर्यायाने राष्ट्रघात केला जात आहेच. तो रोखण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र हवे. त्यासाठी हिंदूंनी स्वतःपासून प्रयत्न केल्यासच ते उद्याचे हिंदु राष्ट्र पाहू शकतील !
– श्री. संतोष गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०२४)