Bangalore Bomb Blast: बेंगळुरू (कर्नाटक) येथील बाँबस्फोट कारागृहात राहून रचण्यात आल्याचे उघड !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील रामेश्‍वरम् कॅफे स्फोट प्रकरणात माझ मुनीर याचा हात असल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) चौकशीत स्पष्ट झाले आहे. राज्यातील परप्पन आग्रहार कारागृहात असलेल्या माझ मुनीर याला एन्.आय.ए.च्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी कह्यात घेऊन त्याची ७ दिवस चौकशी केली. कारागृहात धाड घातल्यावर त्याच्याजवळ काही कागदपत्रे सापडली. त्यातून प्रकरणाशी संबंधित काही धागेदोरे सापडल्याने त्याला या स्फोटातील पहिला आरोपी बनवण्यात आले. कारागृहात बसूनच माझ मुनिर याने स्फोटाचे नियोजन केले होते.

संपादकीय भूमिका

गुन्हेगाराला पकडून कारागृहात ठेवले जाते, याचा उद्देश ‘त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी, त्याला त्याचा पश्‍चात्ताप व्हावा’, हा असतो; मात्र धर्मांध मुसलमान आरोपींच्या संदर्भात असे होत नाही. उलट ते कारागृहात राहूनही गुन्हेगारी कृत्य करण्याचा प्रयत्न करतात, हेच ही घटना दर्शवते ! याचा आता पोलीस आणि सरकार यांनी विचार केला पाहिजे !