‘बालसाधकांच्या सत्संगात सहभागी झालेल्या दैवी बालसाधिकांचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन पुढे दिले आहेत.
१. कु. प्रार्थना पाठक (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)
अ. ‘साधनेतील निश्चय म्हणजे ध्येयनिश्चिती आणि त्यासाठी नित्यनेमाने प्रयत्न करणे म्हणजे सातत्य होय.
आ. आपल्या मनाची नियमित स्वच्छता करण्यासाठी प्रक्रिया (स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून गुणवृद्धी करावयाचे प्रयत्न) राबवायला हवी.’
२. कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
अ. ‘गुरुदेवांनी आपल्याला स्वीकारले आहे, तर आपणही सर्व साधकांना स्वीकारायला हवे.
आ. फळाची अपेक्षा न ठेवता ‘मी आणखी कसे प्रयत्न करू शकतो ?’, हा विचार ठेवून कृती करणे म्हणजे चिकाटी !
इ. गुरुदेवांनी आपल्यासाठी सत्संग उपलब्ध करून दिला आहे. या सत्संगाच्या माध्यमातून ते आपल्यातील गुण वाढवत आहेत आणि स्वभावदोष न्यून करत आहेत.
ई. ‘देवाविना कुणीच काही करू शकत नाही’, ही जाणीव होणे म्हणजे व्याकुळता ! जेव्हा देवासाठी जीव कासावीस होईल, तेव्हाच देव भेटेल. त्यालाच ‘व्याकुळता’ म्हणतात.
उ. ‘मी आता असे वागणार आहे’, असे गुरुदेवांना दिलेले वचन, म्हणजे स्वयंसूचना !’
संग्राहक : कु. शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०२२)