संपादकीय : ‘जशास तसे’ उत्तर द्यावे !

दगडफेकीत घायाळ झालेले हिंदू

जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केल्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांसह ६ जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एकूण ३३ धर्मांध मुसलमानांवर गुन्हे नोंद करून त्यांना अटक केली आहे, तसेच शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात सायंकाळी अंबादेवी गड देवगड येथील मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत एक तरुण घायाळ झाला. या वेळी काही पोलीस कर्मचार्‍यांनाही दगडांचा मार बसला. या प्रकरणात नांदुरा पोलीस ठाण्यात एकूण १०० जणांविरुद्ध गुन्हे नोंद करून आतापर्यंत १६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

हिंदूंवर आक्रमणे !

‘ॐ सर्वे भवन्तु सुखिनः ।’ पासून ते पसायदानात मानवासहित प्राणिमात्रांसाठीही विश्वात्मक देवाकडे प्रार्थना करणारे संत ज्ञानेश्वर अशी समृद्ध आचार-विचार यांची मोठी परंपरा हिंदूंना लाभली आहे. हिंदु धर्म-संस्कृतीत विश्व मांगल्याची कामना करणारे अनेक श्लोक आणि सुभाषिते आहेत. त्या माध्यमातून अगदी पुराण काळापासून ‘विश्वकल्याणाचे आचरण असावे’, असा संस्कार मनामनांवर बिंबवला जातो; पण असे असूनही गेल्या अनेक वर्षांपासून हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे अनुसरण करणार्‍या हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. भारतात रहाणार्‍या हिंदूंना त्यांचे सण आणि उत्सव साजरे करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक करून हिंदूंना मारहाण करण्याच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहेत. झुंडशाहीने आक्रमण करणे, हे तर देशातील काही भागांत नित्याचेच झाले आहे. गेल्या ५ वर्षांत यामध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. हिंदूंच्या उत्सवाच्या वेळी मिरवणुकीवर आतापर्यंत त्यांच्यावर कोण दगडफेक करते ? हे सर्वांना ठाऊक आहे. असे असूनही त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई न केल्याने त्यांचे फावते. पुन्हा ते दगडफेकीचे गुन्हे करण्यास मोकळे होतात.

देशाला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा प्रयत्न !

जगातील मुसलमानांविना अन्य धर्मियांना काफीर समजून एक तर त्यांना जगातून नष्ट करणे किंवा त्यांचे धर्मपरिवर्तन करून त्यांना ‘इस्लाम’ धर्माची दीक्षा घेण्यास बाध्य करणे, यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या मार्गांचा अवलंब करणे, हा इस्लाम धर्माच्या अनुयायांचा आणि त्याच्या निर्मितीपासूनचाच मुख्य विषय (अजेंडा) आहे. इतिहासाकडे नजर टाकली, तर ही वास्तविकता लक्षात येईल. वर्ष ६१० मध्ये इस्लाम धर्माची स्थापना झाली आणि अवघ्या १ सहस्र ४०० वर्षांत या जगातील ५७ देश इस्लामी झाले. या ५७ देशांत असलेले अन्य धर्मीय, त्यांची प्रार्थनास्थळे, सभ्यता आणि संस्कृती यांचा पूर्णपणे विच्छेद करण्यात आला. या ५७ देशांतील सर्व प्रजेसमोर मुसलमान आक्रमकांनी ३ पर्याय ठेवले. पहिला पर्याय ‘इस्लामचा स्वीकार करा’, दुसरा पर्याय ‘या भूमीवरून अन्यत्र निघून जा’ आणि तिसरा पर्याय, म्हणजे ‘वरील २ पर्याय मान्य नसतील, तर मरणाला सिद्ध रहा.’ या पर्यायानुसार काही जणांनी इस्लामचा स्वीकार केला. काही जण स्वतःचा धर्म वाचवण्यासाठी नेसत्या वस्त्रांसह अन्य देशांत पळून गेले, तर काही धर्मासाठी लढता लढता मेले. अशा प्रकारे ५७ देश तलवारीच्या बळावर मुसलमान झाले. भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्यासाठी केलेले प्रयत्न भारताच्या इतिहासाकडे पाहिले, तर दिसून येतात. अनेक मुसलमान आक्रमकांनी या देशावर एकामागून एक आक्रमणे केली आणि या देशातील सभ्यता अन् संस्कृती नष्ट करून या देशाला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा प्रयत्न केला.

‘जशास तसे’ उत्तरे देणे आवश्यक !

मुकेश यांच्या दुकानासमोरील मार्गावर हनुमानचालिसा पठण आणि रामनामाचा जप एकत्रित झालेले सहस्रो हिंदू

बेंगळुरू शहरातील सिद्धत्रा गल्ली परिसरातील जुम्मा मस्जिद मार्गावर मुकेश नावाच्या हिंदूचे दुकान आहे. १७ मार्चच्या सायंकाळी मुकेश हे दुकानात पूजाअर्चा करत होते. या वेळी त्यांनी भजन आणि हनुमानचालिसा लावली होती. प्रतिदिन ते तसे करतात. त्या दिवशी ६-७ धर्मांधांनी मुकेश यांच्या दुकानात शिरून ‘आमच्या अजानच्या वेळी तुम्ही भजने का लावता ?’, असा आरोप करून त्यांच्यावर आक्रमण केले. या घटनाक्रमाचे चित्रीकरण सीसीटीव्हीत झाले. त्याची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली. त्यानंतर १९ मार्च या दिवशी मुकेश यांच्या दुकानासमोरील मार्गावर सहस्रो हिंदू एकत्र येऊन त्यांनी हनुमानचालिसा पठण आणि रामनामाचा जप केला. या प्रकरणात मुकेश यांना मारहाण करणार्‍या धर्मांधांना अटक करण्यात आली, तसेच आंदोलन करणार्‍यांवरही गुन्हे नोंद करण्यात आले. या घटनेवरूनही असे सिद्ध होते की, धर्मांधांना त्यांच्याच भाषेत ‘जशास तसे’ उत्तर दिले, तर हिंदू सुरक्षित रहातील. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कायम मुसलमानांचे लांगूलचालन आणि तुष्टीकरण करणारे सत्तेवर आल्यानंतर धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन, गोहत्या, हिंदु धर्मावरील टीका अशा घटना घडल्यानंतर हिंदू संघटित होऊन त्याचा विरोध करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ‘द कश्मीर फाईल्स’, ‘वीर सावरकर’ अशा चित्रपटांतूनही हिंदूंवर होणारे अत्याचार समोर आल्याने हिंदूंमध्ये आता जागृती होत आहे. हिंदूंनी जागृत होऊन धर्मांधांच्या झुंडशाहीला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी सज्ज रहाणे आवश्यक आहे. आतापर्यंत धर्मांधांचे तुष्टीकरण केल्यामुळे देशात सामाजिक अन् धार्मिक मोठी हानी झाली आहे. अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. हिंदु मुली आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र रचले जात आहे. गोवंश हत्या, अमली पदार्थांची तस्करी यांसह आतंकवाद्यांना साहाय्य करणारा ‘स्लिपर सेल’ देशात कार्यरत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले; पण समाजाचे हित न पहाता केवळ मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी आतापर्यंत शासनकर्त्यांनी धर्मांधांवर कठोर कारवाई केलेली नाही, हे त्रिवार सत्य आहे. झुंडशाहीच्या घटना घडल्यानंतर सुप्रसिद्ध लेखक वि.स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ कादंबरीतील ‘जग माणसाच्या मनातील दयेवर चालत नाही, तर ते मनगटातील बळावर चालते…’ या वाक्याची आठवण येते. आचार-विचार आणि तत्त्वज्ञान कितीही चांगले असले, तरी त्यामागे शक्तीसंपन्न संघटित समाजाचे पाठबळ आवश्यक ठरते.

हिंदूंनी जागृत होऊन धर्मांधांच्या झुंडशाहीला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी सज्ज रहाणे आवश्यक !