Swatantrya Veer Savarkar Movie : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद !

सामाजिक माध्यमांवरही जोरदार चर्चा !

मुंबई – रणदीप हुडा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या चित्रपटाची देशभरात प्रशंसा होत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाने दुसर्‍या आठवड्याच्या अखेरलाही लक्षणीय कमाई केली आहे. या चित्रपटाने दुसर्‍या रविवारी जगभरात २१ कोटी रुपये आणि भारतात १ कोटी ९० लाख रुपयांची कमाई केली.

प्रेक्षक आणि समीक्षक यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे आकर्षक कथानक आणि कलाकारांचे दमदार अभिनय यांचे कौतुक केले आहे. दोन आठवड्यानंतरही हा चित्रपट पहाण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. यावरून चित्रपटाच्या लोकप्रियतेची पुष्टी होते. या चित्रपटाविषयी सामाजिक माध्यमांवरही जोरदार चर्चा चालू आहे.