होळीच्या वेळी मुसलमानांनी आक्रमण केलेल्या पीडित हिंदूंना साहाय्य करण्यास जाण्यापासून रोखले !
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील चेंगीचेर्ला भागात होळीच्या दिवशी मशिदीजवळ होळी खेळणार्या हिंदूंवर मुसलमानांनी आक्रमण केले होते. या प्रकरणी पोलिसांकडून हिंदूंवरच कारवाई करण्यात येत होती. याविरोधात शहरातील गोशामहल भागातील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी आवाज उठवला होता, तसेच ते चेंगीचेर्ला भागाला भेट देणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी टी. राजासिंह यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले. टी. राजासिंह यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून याची माहिती दिली.
Today, I was placed under house arrest by the Telangana Police while en route to #Chengicherala with my team, carrying ration/grocery items for the people who were attacked by extremist groups during the Holi Festival celebrations.
They assaulted our Hindu brothers and sisters,… pic.twitter.com/btahIgQ62c
— Raja Singh (Modi Ka Parivar) (@TigerRajaSingh) March 28, 2024
१. राजासिंह यांनी पोस्ट करतांना समवेत एक छायाचित्रही पोस्ट केले आहे. यात ते त्यांच्या समर्थकांसह घराबाहेर उभे असून तेथे अनेक पोलीसही आहेत. या पोस्टमध्ये टी. राजासिंह यांनी लिहिले आहे की, होळीच्या दिवशी धर्मांधांच्या आक्रमणात घायाळ झालेल्यांना शिधावाटप करण्यासाठी जात असतांना मला नजरकैदेत ठेवण्यात आले. काँग्रेस सरकारने तेथील हिंदूंचे अन्न-पाणी बंद केले आहे. तेलंगाणा राष्ट्र समिती पक्षाच्या मुसलमानांच्या लांगूलचालनाच्या धोरणाला कंटाळून जनतेने चुकून काँग्रेसला निवडले आहे.
२. राजा सिंह यांनी पुढे आरोप केला आहे की, तेलंगाणा पोलिसांनी हिंदूंवरील आक्रमणातील आरोपींऐवजी पीडितांवर गुन्हे नोंदवले आहेत. हिंदूंवर नोंदवलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. तसे न झाल्यास तीव्र प्रतिक्रिया उमटेल.
संपादकीय भूमिकातेलंगाणात काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट आल्यापासून हिंदू आणि त्यांचे नेते यांवर अन्याय होत आहे, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना लक्षात येईल, तो सुदिन ! |