होळीच्या निमित्ताने बाजारपेठा फुलल्या !

मुंबई – राज्यातील विविध शहरांत आणि विशेषतः गावांमध्ये होळी अन् त्यानंतर येणारे धुलिवंदन हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात असल्याने या निमित्ताने कपडे, विविध रंगांच्या आणि आकाराच्या पिचकार्‍या, रंग, तसेच रवा, साखर, गूळ, डाळ आदी किराणासामान यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत.