गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – राज्यातील बदायू येथे साजिद आणि जावेद यांनी २ लहान हिंदु मुलांची गळे चिरून हत्या केल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर गाझियाबाद येथील डासना भागातील शिवशक्ति धामशी संबंधित असलेले अनिल यादव (हे ‘छोटा नरसिंहानंद’ या नावाने ओळखले जातात) यांनी त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून वेब सिटी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. . या तक्रारीत त्यांनी इस्लामचे संस्थापक महंमद पैगंबर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. कुराणामुळे जगात जघन्य गुन्हे घडत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे वर्ष १९८५ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयात कुराणवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. यामुळे देशात काही ठिकाणी, तसेच बांगलादेशात हिंसाचार झाला होता आणि त्यात अनेक हिंदू ठार झाले होते. ही याचिका न्यायालयाने फेटाळली होती.
अनिल यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे की,
१. गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून हिंदु महिला आणि मुली यांच्यावर बलात्कार, हिंदूंची लुटमार, निर्घृण हत्या यांचे कारण दुसरे काहीही नसून केवळ कुराण आहे.
२. पैगंबर महंमद यांनी दिलेली शिकवण आणि कुराणात लिहिलेले कायदे यांची आजपर्यंत कार्यवाही होत आहे. बदायूतील मुलांच्या हत्येने महंमद पैगंबर यांचे स्वप्न असलेल्या ‘गझवा-ए-हिंद’ची (भारतावर आक्रमण करून मुसलमानांनी राज्य स्थापन करण्याची) घंटा वाजली आहे.
३. यामुळे माझ्या भावना दुखावल्या आहेत. सहस्रो हिंदूंना ‘गझवा-ए-हिंद’पासून वाचवण्यासाठी गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे.