बागलकोट (कर्नाटक) येथील सरकारी शाळेतील घटना !
बेंगळुरू (कर्नाटक) – शाळेतील चोरीच्या एका प्रकरणात एका १४ वर्षीय विद्यार्थिनीवर आरोप करून तिचे कपडे काढून तिची तपासणी करण्यात आली. याचा तिला प्रचंड धक्का बसला आणि ती ताण सहन करू शकली नाही. हा धक्का बसल्याने तिने आत्महत्या केली. घटना राज्यातील बागलकोट येथील एका सरकारी शाळेतील आहे.
School girl commits suicide after being strip-searched for theft at a Government School.
📍 Bagalkot (Karnataka)
👉 Strict action should be taken against the school management for such an unreasonable and inhumane behavior.
👉If they are least bothered about the sensitive and… pic.twitter.com/HRwGX6fs4M
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 18, 2024
शाळेत एका शिक्षिकेच्या पर्समधून २ सहस्र रुपये चोरीला गेल्याचे सांगण्यात येऊन शाळेतील ४ विद्यार्थिंनीना बोलावण्यात आले. या वेळी त्यांना निर्वस्त्र करून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर मंदिरात नेऊन ‘देवाची शपथ घ्या आणि ‘चोरी केली नाही’, हे सांगा’, असे सांगण्यात आले. या सगळ्या प्रकाराचा ताण सहन न झाल्याने १४ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. बागलकोटचे पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांनी याविषयीची माहिती दिली आहे. या मुलीच्या आई-वडिलांनी सांगितले की, आमची मुलगी अत्याधिक संवेदनशील होती. २ दिवसांपासून ती कुणाशीही काही बोलत नव्हती.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे अमानवीय पद्धतीने तपासणी करणार्या शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाईच झाली पाहिजे ! मुलांच्या संवेदनशील मनाची कल्पना नसणार्या शाळेकडून त्यांना कसे घडवले जात असेल, याचा विचारच न केलेला बरा ! |