म्हापसा, १७ मार्च (वार्ता.) : तपोभूमी येथील पिठाधिश्वर पद्मश्री धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी ‘कळंगुट येथे थायलंडसारखी जीवनशैली झाली आहे’, असे विधान नुकतेच केले होते. कळंगुट येथील रहिवाशांनी सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी केलेले विधान योग्यच असल्याचे म्हटले आहे. स्थानिकांच्या मते कळंगुट येथील ‘डान्सबार’ न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झालेले असले, तरी याच व्यावसायिकांनी ‘बार अँड रेस्टॉरंट’च्या (मद्यालय आणि उपाहारगृह या) नावाने परवाना घेऊन तेथे अनधिकृतपणे ‘मसाज पार्लर’ चालू केले आहेत.
कळंगुट येथील रहिवाशांनी सांगितले की, कळंगुट सध्या जो अनधिकृत प्रकार चालू आहे, तो बंद करण्यासाठी स्थानिकांनी पुष्कळ प्रयत्न केले; मात्र यश आलेले नाही. सरकारला असे प्रकार बंद करायचे असल्यास ते एका दिवसात बंद होऊ शकतात.
संपादकीय भूमिकाडान्सबारच्या चालकांनीच चालू केले अनधिकृत मसाज पार्लर असे मसाज पार्लर चालू होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? |