२७ ते २९.१०.२०२३ या कालावधीत सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका शिबिराच्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
१. ‘रामनाथी येथील आश्रमातील शिबिरासाठी मला जाण्याची संधी मिळणार’, असे मला समजले. तेव्हा गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि पू. दीपालीताई (पू. दीपाली मतकर, सनातनच्या ११२ व्या संत) यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या वेळी ‘आपल्या मनातील प्रत्येक इच्छा गुरुदेव पूर्णच करतात’, याची मला जाणीव झाली.
२. आश्रमात आल्यानंतर मला पुष्कळ हलके वाटले. गुरुदेवांच्या कृपेने माझा नामजप अखंड चालू होऊन ‘मी गुरूंच्या सान्निध्यात रहात आहे’, याची जाणीव माझ्या मनाला सतत होत होती.
३. शिबिरात शंखनाद झाला. त्या वेळी ‘शंखामधून निळा रंग सर्वत्र पसरत आहे’, असे मला जाणवले.
४.‘मी शिबिरात भावाच्या स्तरावर प्रयत्न करून प्रार्थना करत असतांना साक्षात् गुरुदेवांकडून पुष्कळ चैतन्य येत असून आश्रमाच्या आजूबाजूला सुदर्शनचक्र फिरत आहे’, असे मला जाणवत होते. शिबिर चालू असतांना ‘गुरुदेवच आपल्याभोवती संरक्षककवच सिद्ध करत आहेत’, असे मला जाणवले आणि मला सोनेरी प्रकाश दिसला.
५. मला आश्रमातील महाप्रसादातून पुष्कळ चैतन्य मिळाले.’
– श्री. गोपी व्हनमारे, सोलापूर (४.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |