साधकांनो, आपोआप होत असलेला नामजप न करता आध्‍यात्‍मिक त्रास न्‍यून होण्‍यासाठी उपाय म्‍हणून सांगितलेला नामजप करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘काही वेळा साधकांचा आध्‍यात्‍मिक त्रास न्‍यून होण्‍यासाठी उपाय म्‍हणून संत किंवा उत्तरदायी साधक त्‍यांना विशिष्‍ट नामजप करण्‍यास सांगतात. ‘आमच्‍याकडून उपायांसाठी सांगितलेला नामजप होत नाही. आमचा ‘प.पू. डॉक्‍टर’ किंवा ‘सच्‍चिदानंद परब्रह्म’, असा नामजप आपोआप होत असल्‍याने आम्‍ही तो करतो’, असे साधक नंतर सांगतात.

येथे साधकांनी हे लक्षात घ्‍यावे की, त्‍यांना उपाय म्‍हणून सांगितलेला नामजप हा त्‍यांचा आध्‍यात्मिक त्रास न्‍यून होण्‍यासाठी आवश्‍यक असतो. त्‍यामुळे त्‍यांनी आपोआप होत असलेला नामजप न करता उपायांसाठी सांगितलेला नामजपच करावा.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (६.२.२०२४)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे
निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.