१. सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी होण्यास विरोध करणारे कुटुंबीय गुरुकृपेने सकारात्मक होऊन व्यष्टी आणि समष्टी साधनेत सहभागी होऊ लागणे
‘पूर्वी मला सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी होण्यास आई-वडील, पत्नी आणि भाऊ यांचा तीव्र विरोध होता. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने आता मला पुष्कळ चांगल्या अनुभूती येत आहेत. मी गुरुमाऊलींच्या कृपेने सेवा करतच राहिलो. आता विरोध तर राहिला नाही; पण माझे कुटुंबीय काही प्रमाणात सकारात्मक होऊन व्यष्टी आणि समष्टी साधनेत सहभागी होत आहेत. केवळ गुरुमाऊलींच्या कृपेने हा पालट कुटुंबियांमध्ये झाला. त्याबद्दल कृतज्ञता कितीही व्यक्त केली, तरी अल्पच आहे.
२. गुरुदेवांनी मनोवांछित गोष्टी पूर्ण करणे
गुरुदेव माझ्या मनातील सर्व गोष्टी ओळखतात आणि त्या लगेच पूर्ण करतात. मग त्या कोणत्याही प्रकारच्या, उदा. समष्टी, व्यवहार, नोकरी किंवा कटुंबातील असोत, ‘ते लगेच अनुभूती आणि दृष्टांत देतात’, असे मी प्रतिदिन अनुभवतो.
३. गुरुदेवांच्या कृपेमुळे कुटुंबियांना सनातनचा आश्रम पहायला मिळणे आणि संतांचे दर्शन होणे
आज गुरुदेवांनी माझी एक मोठी इच्छा पूर्ण केली. ती म्हणजे जे मला विरोध करत होते, त्यांनाच सनातनचा आश्रम पहायला मिळाला, तसेच संतांचे दर्शनही झाले. पुष्कळ दिवसांपासून घरच्यांना हे सर्व दाखवायचे होते, ती इच्छा आज पूर्ण झाली. त्याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. विनोद कोंडावार, नांदेड (२२.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |