१. सौ. नीलम अविनाश रासकर, धनकवडी, पुणे.
अ. ‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पाऊल टाकताक्षणी मला पुष्कळ चैतन्य मिळाल्यासारखे वाटले.
आ. ध्यानमंदिरात ध्यानाला बसल्यावर मला उठावेसेच वाटत नव्हते. तेथे मला एक प्रकारची मानसिक शांतता आणि सात्त्विकता अनुभवायला मिळाली.
‘आश्रमात येण्याची आणि येथे सेवा करण्याची संधी आम्हाला वेळोवेळी मिळत राहो’, हीच गुरुचरणी प्रार्थना !’ (१२.३.२०२२)
२. सौ. अलका अशोक काजणे, कुर्ला, मुंबई.
अ. ‘हल्लीच्या पाश्चिमात्त्य विचारसरणीत ‘सनातन संस्था’ आपल्या हिंदु संस्कृतीची जोपासना करण्याचे मौलिक कार्य करते. ते अत्यंत आवश्यक आहे.
आ. येथील स्वच्छता आणि प्रसन्नचित्त मनाने कार्यरत असलेले सर्व साधक पाहून माझे मन आनंदी झाले.’ (३१.५.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |