Pakistan Terrorism Factory : पाकची ‘आतंकवादाचा कारखाना’ म्हणून जागतिक स्तरावर ओळख !

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला पुन्हा फटकारले !

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी जगप्रीत कौर

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत जम्मू-काश्मीरचे सूत्र   उपस्थित केल्याबद्दल भारताने पाकिस्तानला फटकारले. पाकिस्तानच्या या वर्तनावर टीका करतांना भारताने म्हटले आहे की, पाकिस्तानला मानवी हक्कांच्या संदर्भात अत्यंत वाईट इतिहास लाभला आहे. त्याचे त्याने आत्मपरीक्षण करावे. पाकिस्तानची ‘आतंकवादाचा कारखाना’ म्हणून जागतिक स्तरावर ओळख झाली आहे.

जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी जगप्रीत कौर यांनी पाकला फटकारले. यापूर्वी पाकिस्तानने ‘इस्लामी सहकार्य संघटने’च्या (‘ओ.आय.सी.’च्या) वतीने बोलतांना जम्मू-काश्मीरचे सूत्र उपस्थित केले होते.

संपादकीय भूमिका

कुत्र्याच्या शेपटीला किती सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ती वाकडीच रहाते, तसेच पाकिस्तानचे आहे. गेंड्याच्या कातडीच्या पाकला कितीही फटकारले, तरी त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही, हेच खरे !