Delhi Budget 2024 : रामराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेत आहोत ! – देहलीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना

देहलीच्या आपच्या अर्थमंत्र्यांचे हास्यास्पद वक्तव्य !

देहलीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना

नवी देहली – या सभागृहात उपस्थित असलेले सर्व लोक प्रभु श्रीरामापासून प्रेरित आहेत. रामराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही गेल्या ९ वर्षांपासून अहोरात्र परिश्रम घेत आहोत. आम्ही देहलीतील लोकांना समृद्धी देण्याचा प्रयत्न केला आहे. अजून पुष्कळ काही करायचे आहे; पण गेल्या ९ वर्षांत आम्ही पुष्कळ काही केले आहे, असे वक्तव्य देहलीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना यांनी केले.

मार्लेना यांनी ४ मार्च या दिवशी देहली विधानसभेत २०२४-२५ या वर्षासाठी ७६ सहस्र कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्या वेळी मार्लेना यांनी वरील विधान केले. त्या म्हणाल्या की, अर्थसंकल्पात १८ वर्षांवरील महिलांना प्रतिमहा १ सहस्र रुपये देण्याची आम्ही घोषणा करत आहोत. यासाठी सरकारने ‘महिला सन्मान योजना’ आणली आहे.

संपादकीय भूमिका

  • जो राजकीय पक्ष ‘जे.एन्.यू.’मधील राष्ट्रविघातक शक्तींना पाठीशी घालतो, कथित शेतकरी आंदोलनाच्या आडून खलिस्तानी आणि जिहादी आतंकवादी शक्तींवर कारवाई करायचे सोडून त्यांना साहाय्य करतो, ज्या पक्षाचे उपमुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारागृहात आहेत, ज्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते म्हणे रामराज्य आणणार ! अशा पक्षाला रामराज्याचा अर्थतरी ज्ञात आहे का ?
  • रामराज्य येण्यासाठी प्रभु श्रीरामासोरखे राज्य करणारा राजा असणे आवश्यक आहे. आपमध्ये असा एक तरी नेता आहा का ?