सनातन संस्थेच्या सत्संगामुळे हिंदु धर्माची महानता लक्षात येणे

सौ. अनुपम गुप्ता

‘सनातन संस्थेच्या सत्संगात उपस्थित रहाण्याचे भाग्य मला लाभले. मी सत्संगात आले नसते, तर मला हिंदु धर्माची महानता आणि व्यापकता कधीच समजली नसती. सत्संगातील विविध विषयांमधून मला चांगली माहिती मिळाली. सत्संगात अनेक प्रश्नांची उत्तरे चांगल्या प्रकारे आणि स्पष्ट करून दिली जातात. सत्संगांमधून मला ‘सनातन धर्म’ म्हणजे नेमके काय ? देवघरात देवतांची मांडणी कशा पद्धतीने करावी ? नामजप कोणता करावा ? कपाळावर टिळा का लावावा ? टिळा लावण्याचे महत्त्व काय आहे ? विविध सणांच्या प्रसंगी देवीदेवतांचे पूजन कसे करावे ? कुलदेव किंवा कुलदेवीचा नामजप कशा पद्धतीने करावा ? अशी सूत्रे शिकायला मिळाली. दैनंदिन जीवनातील ही सूत्रे छोटी वाटत असली, तरी त्यांचे महत्त्व पुष्कळ आहे.

माझे वय ४५ वर्षे आहे; परंतु आतापर्यंत मला हिंदु धर्मातील वरील सूत्रांविषयी माहिती नव्हती, तर मी माझ्या मुलांना धर्माविषयीचे शिक्षण कसे देणार होते ?

सत्संगात सांगितल्यानुसार नामजपास प्रारंभ केल्यापासून माझ्या जीवनातील अडचणी दूर होत आहेत. नामजप करण्यासाठी मला पहाटे ४ वाजता आपोआप जाग येते. ही अनुभूती म्हणजे माझ्यासाठी चमत्कारच आहे. राजस्थान येथील श्रीमती शुभ्रा भार्गव यांच्यामुळेच मला सनातनचा सत्संग लाभला आणि मी सनातन संस्थेशी जोडले गेले. यासाठी मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटते.’

– सौ. अनुपम गुप्ता, बिकानेर, राजस्थान. (२०.१०.२०२३)