France Will Expel Infiltrators : फ्रान्स त्याच्या देशातील पाकसह १० देशांच्या २३ सहस्र घुसखोरांना हाकलणार !

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समध्ये मार्चपासून २३ सहस्र घुसखोरांना बाहेर काढण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. यात सीरिया, इराक, पाकिस्तान, मोरक्को, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त या देशांतील लोकांचा समावेश आहे. या कारवाईकडे फ्रान्समध्ये कट्टरता वाढणे आणि ऑगस्टमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक खेळांची सिद्धता या दृष्टीने पाहिले जात आहे. गेल्या वर्षी फ्रान्सने ३८ सहस्र लोकांना बाहेर काढले होते. ते फ्रान्समध्ये रहात होते. यापैकी बहुतांश घुसखोरी करणारे होते. फ्रान्सने नुकतेच देशाच्या झेंड्यावर वादग्रस्त टीप्पणी करणार्‍या ट्युनिशियाच्या इमामाला (मशिदीमध्ये प्रार्थना करवून घेणारा) देशातून हाकलून लावले होते.

संपादकीय भूमिका

घुसखोरांना हाकलण्याच्या संदर्भात फ्रान्स प्रत्यक्ष कृती करतो, तर भारतात केवळ भाषणबाजी होते. भारत फ्रान्सकडून कठोर कारवाई कशी करायची हे शिकून कृतीत आणेल तो सुदिन !