BJP Delegation Sandeshkhali : संदेशखाली येथे जाण्यापासून भाजपच्या महिलांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी रोखले !

भाजपच्या महिला खासदार लॉकेट चॅटर्जी

कोलकाता (बंगाल) – संदेशखाली येथील हिंदु महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी भाजपच्या महिला शिष्टमंडळाला येथे जाण्यापासून पोलिसांनी रोखले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपच्या महिला खासदार लॉकेट चॅटर्जी करत होत्या. या वेळी त्यांच्यात आणि पोलीस यांच्यामध्ये वादही झाला. यानंतर खासदार लॉकेट चॅटर्जी यांना कह्यात घेण्यात आले. यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही केंद्रीय मंत्री आणि महिला खासदार यांच्या शिष्टमंडळाला संदेशखाली येथे जाण्यास रोखण्यात आले होते.


दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) पसार असणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदवला आहे. रेशन घोटाळ्यात ईडीने बंगालमधील ६ ठिकाणी धाडी टाकल्या.

६ मार्चला पंतप्रधान मोदी संदेशखाली येथे जाऊ शकतात ! – भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्च या दिवशी संदेशखाली येथे जाऊ शकतात, अशी माहिती भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी दिली.