मुसलमानांच्या घरी भाड्याने रहात असतांना केला होता इस्लामचा स्वीकार
फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथील अधारी गावचे रहिवासी अब्दुल्ला आणि त्यांची पत्नी फातिमा यांनी हिंदु धर्म स्वीकारला. हे दांपत्य २५ वर्षांपूर्वी बनारसहून येथे नोकरीसाठी आले होते. पतीचे नाव शिवप्रसाद, तर पत्नीचे नाव कविता होते. अधारी गावात आल्यानंतर ते हिंदु जोडपे एका मुसलमान कुटुंबाच्या घरी भाड्याने रहात होते. मुसलमान कुटुंबाच्या सल्ल्यानेच त्यांनी इस्लाम स्वीकारला होता. आता त्यांनी ‘घरवापसी’ केली आहे.
१. ६ महिन्यांपूर्वी या जोडप्याने आधारी गावात घर बांधले. या कालावधीत त्यांनी हिंदु संघटनेच्या लोकांशी संपर्क साधून संपूर्ण हकीकत सांगितली. यानंतर हिंदु संघटनांच्या लोकांच्या उपस्थितीत सुंदरकांड पठण आणि हवनपूजा करून हिंदु धर्माचा स्वीकार केला. ‘आम्ही सनातनी होतो, सनातनीच राहू,’ असे शिवप्रसाद म्हणाले.
२. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्रीरामदलाचे अध्यक्ष अजेंद्र साहू म्हणाले की, हिंदु धर्मातील या दोघांनी काही कारणास्तव इस्लाम स्वीकारला होता. त्याला हिंदु धर्मात परत यायचे होते. आम्ही त्यांना सुरक्षा दिली आणि पूर्ण साहाय्य केले.