Haldwani Violence : समाजवादी पक्षाच्या नेत्याचा भाऊ जावेद सिद्दीकी याला अटक

  • हल्द्वानी (उत्तराखंड) येथील हिंसाचाराचे प्रकरण

  • समाजवादी पक्षाच्या अन्य नेत्यांचाही हिंसाचारात सहभाग !

हल्द्वानी (उत्तराखंड) – हल्द्वानी येथील हिंसाचारासाठी चिथावणी दिल्यावरून येथील समाजवादी पक्षाचे नेते मतीन सिद्दीकी यांचा भाऊ जावेद सिद्दीकी याला अटक करण्यात आली आहे. या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. जो बेकायदेशीर मदरसा पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकारी गेले होते, तो मदरसा अब्दुलच्याच कह्यात होता. यासह समाजवादी पक्षाच्या आणखी काही नेत्यांची नावेही समोर आली आहेत. त्यांपैकी एकाचे नाव अर्शद अयुब आहे. बनभूलपुरा येथील नगरसेवक झीशान परवेझ याचाही हिंसाचारात हात आहे.

१. हल्द्वानी येथील संचारबंदी हटवण्यात आली आहे; मात्र ज्या भागात हिंसाचार झाला, त्या बनभूलपुरा येथील संचारबंदी अद्याप कायम आहे.

२. सीसीटीव्हीच्या साहाय्याने दंगलखोरांची ओळख पटवली जात आहे. ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर लक्ष ठेवले जात आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

३. दंगलखोर धर्मांध मुसलमानांनी बेकायदेशीर शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरून अनेक निरपराधांना ठार केल्याची माहिती मिळाली आहे.

ठार झालेल्यांमध्ये २ हिंदूंचा समावेश

हल्द्वानी येथील हिंसाचारात मृत झालेल्यांमध्ये २ हिंदूंचा समावेश आहे. एकाचे नाव अजय, तर दुसर्‍याचे नाव प्रकाश कुमार आहे. या दोघांनाही गोळ्या झाडून ठार करण्यात आले. प्रकाश याला ठार करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकण्यात आला होता. अजय औषध घेण्यासाठी घराबाहेर पडला असतांना त्याला गोळी लागली. या दोघांना पोलिसांच्या गोळ्या लागल्याचे येथे म्हटले जात आहे; मात्र पोलिसांनी गोळीबार केलाच नव्हता, हे उघड झाल्याने ‘हे दोघे धर्मांध मुसलमानांच्या गोळीबारात ठार झाले आहेत’, असे म्हटले जात आहे.

दंगलखोर जंगलात लपले असल्याची माहिती

पोलिसांनी दंगलखोरांचा शोध चालू केल्यावर दंगलखोर येथील जंगलात लपून बसल्याचे म्हटले जात आहे. यामुळे वन विभागाकडून जंगलांमध्ये गस्त घालणे चालू करण्यात आले आहे. ‘वनक्षेत्राचे संरक्षण आणि संशयितांची घुसखोरी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील’, असे वन विभागाचे अधिकारी गौला चंदन अधिकारी यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • समाजवादी पक्ष म्हणजे दुसरी मुस्लिम लीग झाली असून आता तिच्यावर बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !
  • ‘देशात मुसलमान असुरक्षित झाले आहेत’, असे म्हणणारे ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता कुठल्या बिळात लपले आहेत ?
  • इस्लामी देशांच्या संघटनेला भारतातील धर्मांध मुसलमान करत असलेला हिंसाचार दिसत नाही का ?
  • चीनने त्याच्या देशातील उघूर मुसलमानांना ज्या प्रकारे सुधारगृहात ठेवून त्यांना ‘सुधरवण्या’चा प्रयत्न चालू केला आहे, तसा प्रयत्न भारतातही करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !