वलांडी (जिल्हा लातूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या अस्लाफ कुरेशी याच्यावर कठोर कारवाई करा ! – हिंदु महासभा

अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु महासभेचे पदाधिकारी, तसेच अन्य

कोल्हापूर – लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील हिंदु खाटीक समाजाच्या ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अस्लाफ मेहबूब कुरेशी याला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने केलेले कृत्य मानवतेला काळिमा फासणारे असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु महासभेच्या वतीने कोल्हापूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. या प्रसंगी अखिल भारतीय हिंदु खाटीक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (मासुर्लीकर), हिंदु महासभेच्या प्रदेशाध्यक्षा सौ. दीपाली खाडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य उपस्थित होते. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)