America Britain Joint Operation : अमेरिका आणि ब्रिटन यांच्याकडून येमेनमधील हुती बंडखोरांच्या कह्यातील भागांवर आक्रमण !

  • लाल समुद्रात व्यापारी नौकांवरील आक्रमणांचा उगवला सूड !

  • लाल समुद्रात भारताच्याही १० युद्धनौकात तैनात !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनूक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका आणि ब्रिटन यांच्या सैन्याने येमेनमधील हुती बंडखोरांच्या कह्यातील भागांवर आक्रमण केले. वर्ष २०१६ नंतर येमेनमधील हुती बंडखोरांवरील अमेरिकेचे हे पहिले आक्रमण आहे. येमेनमध्ये लढाऊ विमाने आणि टॉमहॉक क्षेपणास्त्रे यांद्वारे हे आक्रमण करण्यात आले. इस्रायल-हमास युद्धामुळे हुतींनी गाझाला पाठिंबा देण्यासाठी लाल समुद्रातील नौकांवर आक्रमणे चालू केली आहेत. याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, ही कारवाई लाल समुद्रातील व्यापारी नौकांवर हुती बंडखोरांनी केलेल्या आक्रमणाचा सूड उगवण्यासाठी करण्यात आली आहेत.

जगातील अनुमाने १५ टक्के सागरी वाहतूक लाल समुद्रातून होते. हुतींच्या आक्रमणामुळे येथून होणार्‍या या वाहतुकीविषयी समस्या निर्माण झाली आहे. याविषयी जो बायडेन म्हणाले की, हुतींच्या आक्रमणांमुळे लाल समुद्रातून जाणार्‍या २ सहस्र नौकांना त्यांचा मार्ग पालटावा लागला. आम्ही या मार्गाचे रक्षण करण्यासाठी अधिक कठोर आदेश देण्यास मागे-पुढे पाहणार नाही.

भारतानेही लाल समुद्रात भारतीय नौकांच्या सुरक्षेसाठी १० युद्धानौका पाठवल्या आहेत.