China Patriotic Education: चीनमध्ये देशभक्तीपर शिक्षण देणारा कायदा लागू !

बीजिंग (चीन) – चीनमधील जनता आता देशभक्तीला प्राधान्य देत नसल्याचे चीन सरकारला वाटते. त्यामुळे चीन सरकारने देशभक्तीपर शिक्षण कायदा लागू केला आहे. पुढील आठवड्यापासून चीनमध्ये हा कायदा लागू होणार आहे. देशभक्तीपर शिक्षण कायद्याचा उद्देश राष्ट्रीय एकात्मता वाढवणे, हा आहे.  सरकारी अधिकार्‍याने पत्रकार परिषदेत सांगितले की, या कायद्याचे उद्देश ‘चीनला वैचारिकदृष्ट्या एकजूट करणे, सशक्त देश बनवणे आणि राष्ट्रीय पालट निर्माण करण्यासाठी एकत्र येणे’, हे आहेत.

या कायद्यानुसार लहान मुले, नागरिक, कामगार, तसेच सर्व क्षेत्रांतील व्यावसायिक यांना सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षावर विश्‍वास दाखवावा लागणार आहे. मुलांच्या शाळांमधील अभ्यासक्रमात देशभक्ती कायद्याविषयीचा अभ्यासक्रमही जोडला जाणार आहे.

संपादकीय भूमिका

भारतातही असा कायदा करून जनतेला ‘देशभक्ती कशी केली जाते ?’ हे शिकवणे आवश्यक आहे !