सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची अनमोल वचने आणि मार्गदर्शन

 १. गुणवृद्धीमुळेच ईश्वराला अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करणे शक्य असणे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘ईश्वरप्राप्तीसाठी गुण वाढवणे अत्यावश्यक आहे. वेळच्या वेळी सेवा करणे, त्या दिवशीची सेवा त्याच दिवशी करणे, कार्यपद्धतीचे पालन करणे आणि वेळेचे पालन करतांना ती सेवा योग्य पद्धतीने करणे, या प्रयत्नांद्वारे गुणवृद्धीच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या उद्देशाने साधकाचे प्रयत्न चालू असले, तर गुणवृद्धीमुळेच ईश्वराला अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करणे शक्य होते.

२. आज्ञापालन करतांना गुरुतत्त्वाचेच आज्ञापालन करत आहोत, असा साधकाचा भाव असणे आवश्यक !

गुरुदेवांव्यतिरिक्त अन्यांचे आज्ञापालन करतांना ‘एखाद्या साधकाचे किंवा अन्य व्यक्तीचे आपण आज्ञापालन करत आहोत’, असा विचार मनात यायला नको. ‘तो साधक किंवा व्यक्ती यांच्या माध्यमातून आपण गुरुतत्त्वाचेच आज्ञापालन करत आहोत’, असा साधकाचा भाव असला पाहिजे.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१३.१.२०२३)