सत्‍संगाचा महिमा

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

एका साधकाने प्रश्‍न केला, ‘महाराज, परमार्थात सत्‍संगाचे एवढे महत्त्व का ?’ श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज) म्‍हणाले, ‘बुद्धी स्‍थिर रहाणे फार कठीण आहे. त्‍यात भगवंताची कृपा आहे; म्‍हणून दांभिक, नास्‍तिक, विरोधी मतांची माणसे संगतीत ठेवू नयेत. त्‍यांच्‍यामुळे बुद्धीभेद होतो आणि तो झाला की, मग आवरत नाही. वाईट संगतीत राहूनही परिणाम न होऊ देणे, हे मोठ्यांचे काम आहे. बुद्धीभेदाला अगदी अल्‍पसे कारण पुरते. त्‍यात आपण स्‍वतःचाच नाश करून घेतो; म्‍हणून सत्‍संगाला अतिशय महत्त्व आहे. ब्रह्मदेव जरी खाली आला, तरी नामाची निष्‍ठा न्‍यून होऊ देऊ नये.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांच्‍या हृद्य आठवणी’ या पुस्‍तकातून, लेखक : ल.ग. मराठे)