धार्मिक ग्रंथांचे वाचन का करावे ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती

धार्मिक ग्रंथांचे पारायण होते; पण त्‍यामागची भावना ‘पुण्‍य लागणे’, एवढीच असते किंवा काही सांसारिक फलप्राप्‍तीच्‍या आशेने ग्रंथ वाचले जातात. बोधासाठी ग्रंथ वाचले जात नाहीत. ‘ज्ञानेश्‍वरी’, ‘गाथा’, ‘दासबोध’, असे पवित्र ग्रंथ हे त्‍यातून सद़्‍वर्तनाचा, सदाचरणी जीवनाचा, सात्त्विक स्‍वभावाचा बोध घेण्‍यासाठी वाचावयाचे असतात, हे कुणी लक्षातच घेत नाही. परिणामी त्‍या ग्रंथांची पारायणे तेवढी होतात; पण माणसे जशीच्‍या तशीच रहातात.

– प.पू. स्‍वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘कर्मयोग’)