तेल अवीव (इस्रायल) : इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवर ड्रोनद्वारे केलेल्या आक्रमणामध्ये हमासचा उपनेता सालेह अल-अरौरी ठार झाला. हमासनेही याला दुजोरा दिला आहे. हमासचा नेता इस्माईल हनीये याने अरौरी याच्या मृत्यूचा सूड घेण्याची शपथ घेतली आहे. त्याने म्हटले की, या आक्रमणामुळे लेबनॉनच्या सार्वभौमत्वाला धक्का बसला आहे. आता जे काही होईल, त्याला इस्रायल स्वतः उत्तरदायी असेल.
(सौजन्य : ABC News)
Hamas deputy leader killed in Israel’s attack on #Lebanon
Tel Aviv (Israel) – Israeli military drone attack on Hezbollah’s bases in Lebanon killed #Hamas deputy leader Saleh al-Arouri.
Hamas also confirmed his death. Hamas leader Ismail Haniyeh vowed to avenge al-Arouri’s… pic.twitter.com/QoS2f5tUX7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 3, 2024
आतापर्यंत २२ सहस्र पॅलेस्टिनींचा मृत्यू
गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायलच्या आक्रमणात आतापर्यंत २२ सहस्र पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.