(सायबर गुन्हे म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून केलेले गुन्हे)
नवी देहली : केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल’ संकेतस्थळ आणि राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग यांच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांमध्ये होणार्या विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा अहवाल बनवला आहे. यानुसार देशात महाराष्ट्र आणि तेलंगाणा या राज्यांत सर्वाधिक सायबर गुन्हे झाल्याचे निदर्शनास आले आहे.
Maharashtra and Telangana states report highest number of #cybercrime cases !
– Home Affairs Ministry's report pic.twitter.com/ZK2kpH005O— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 3, 2024
१. अहवालानुसार देशभरात सामाजिक माध्यमांतून बनावट बातमी (फेक न्यूज) पसरवण्याचे गुन्हे ६ राज्यांत सर्वाधिक असल्याचे आढळले आहे. यामध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथे सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत. वर्ष २०२२ मध्ये बनावट बातमीची २३० गुन्हे नोंदवण्यात आले. यांपैकी तेलंगणात ८१, तर तमिळनाडूत ३७ गुन्हे नोंदवण्यात आले.
२. वर्ष २०२२ मध्ये देशभरात ‘एटीएम्’द्वारे फसवण्याचे १ सहस्र ६९० गुन्हे नोंदवले गेले. यांत बिहार सर्वांत पुढे आहे. बिहारमध्ये ‘एटीएम्’द्वारे फसवणुकीचे ६३८ गुन्हे नोंदवले गेले आहेत. यानंतर तेलंगणा (६२४ गुन्हे) आणि महाराष्ट्र (१४४ गुन्हे) यांचा क्रमांक येतो.
३. सामाजिक माध्यमांवर खोटी ओळख (फेक प्रोफाइल) दाखवून फसवणूक केल्याचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्र आणि राजस्थान येथे घडल्याचे समोर आले. या गुन्ह्यांची एकूण १५७ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. त्यांत एकट्या महाराष्ट्रात ४८, तर राजस्थानात ३३ प्रकरणे समोर आली.