मुंबई – वरळी सी फेस ते मरिन ड्राइव्ह या दरम्यानच्या मार्गिकांना जोडणारा कोस्टल रोड फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालू होण्याची चिन्हे आहेत. वाहतूककोंडी टाळण्यासाठी याचा मोठा लाभ होणार आहे. दक्षिण मुंबईतील वाहतुकीला नवी दिशा देण्यासाठी हाती घेण्यात आलेला हा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग आहे. त्यामुळे अर्धा ते पाऊण घंट्याचा प्रवास १० मिनिटांत शक्य होणार आहे. पुलासाठी खांबाच्या आराखड्यात झालेला पालट, भूमीगत वाहनतळाचे न्यायालयात गेलेले प्रकरण यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. सध्या या प्रकल्पाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे ३४ टक्के इंधन बचत आणि ७० टक्के वेळेची बचतही होणार असल्याचे म्हटले जाते.