USCIRF : (म्हणे) ‘अमेरिकेने भारतावर निर्बंध घालावेत !’ – अमेरिकेतील सरकारी संस्थेची मागणी

  • अमेरिकेतील सरकारी संस्थेची सलग तिसर्‍या वर्षी केली मागणी !

  • भारतात अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आक्रमणे होत असल्याचा कांगावा

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘यूएस् कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम’ नावाच्या अमेरिकेच्या सरकारी संस्थेने ‘भारतात अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर सातत्याने आक्रमणे होत आहे’, असे सांगत सलग तिसर्‍या वर्षी भारतावर निर्बंध लादलण्याची मागणी केली आहे. या संस्थेकडून सातत्याने करण्यात येणार्‍या भारतविरोधी शिफारसींनंतरही जो बायडेन सरकारने भारताविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. भारतातील अमेरिकी दूतावासाने या शिफारसीवर काहीही विधान केलेले नाही. त्याचबरोबर भारत हे आरोप सतत फेटाळत आहे.

१. या संस्थेच्या म्हणण्यानुसार, भारत सरकार परदेशात वास्तव्य करणार्‍या भारतीय वंशाच्या अल्पसंख्यांकांना लक्ष्य करत आहे. यामुळे या संस्थेने ‘विशेष चिंता असलेल्या देशां’च्या सूचीमध्ये भारताचा समावेश करण्याची शिफारस केली आहे.

२. या संस्थेचे आयुक्त स्टीफन श्‍नेक यांनी कॅनडात खलिस्तानी आतंकवादी निज्जर याची हत्या आणि गुरपतवंत सिंह पन्नू याच्यावर आक्रमण करण्याच्या प्रयत्नांचा हवाला देत ‘ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतात अल्पसंख्यांकांच्या नाही, तर बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आक्रमणे होत आहेत, हे या संस्थेला दिसत नाही !
  • अल्पसंख्यांकांवरील आक्रमणाचा विचार केला, तर अमेरिकेतच अश्‍वेत नागरिकांवर होणार्‍या आक्रमणांचा विचार करत भारताने अमेरिकेवर निर्बंध घातले पाहिजेत !