तेल अविव – अमेरिकेचे संरक्षणमंत्री इस्रायलच्या दौर्यावर आहेत. या वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ‘हमासच्या विरोधात संपूर्ण विजय मिळवण्याचे आमचे ध्येय आहे. हे युद्ध केवळ इस्रायलचे नाही, तर अमेरिकेचेही आहे; कारण इराणने बाब अल-मंदेबचा सागरी मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे जगाच्या जलवाहतुकीच्या स्वातंत्र्याला मोठा धोका निर्माण झाला आहे’, असे नेतान्याहू यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलला दिलेल्या पाठिंब्याविषयी अमेरिकेचे आभार मानले. या वेळी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिनही उपस्थित होते.
Prime Minister Benjamin Netanyahu and US Secretary of Defense Lloyd Austin, at the Kirya in Tel Aviv, issued the following statements at the start of the expanded meeting with the members of the War Cabinet.https://t.co/ouDZBnt7Hc pic.twitter.com/pYALpfpLdQ
— Prime Minister of Israel (@IsraeliPM) December 18, 2023
लॉयड ऑस्टिन या वेळी म्हणाले, ‘‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन वारंवार सांगत आहेत की, आमची इस्रायलशी बांधीलकी आहे आणि हे स्पष्ट करण्यासाठी मी येथे आलो आहे. आम्ही इस्रायलच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. हमासच्या क्रूरतेचा इस्रायलवर परिणाम झाला आहे. अमेरिकन नागरिकांसह इस्रायली नागरिक अजूनही हमासच्या कारागृहांमध्ये आहेत. अमेरिका इस्रायलला आवश्यक असलेली सर्व शस्त्रे आणि उपकरणे पुरवेल.’’