Donald Trump : पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यास इस्लामी देशांतील नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवासावर बंदी घालणार ! – डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा !

डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क (अमेरिका) – जर मी दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष झालो, तर पुन्हा एकदा जिहादी देशांवर बंदी आणली जाईल आणि त्यांच्या अमेरिकेतील प्रवासावरही बंदी घातली जाईल, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील असणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प पुढे म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मी बेकायदेशीरपणे येणार्‍या लोकांची वैचारिक पडताळणी करीन. जर ते अमेरिकेचा द्वेष करत असतील, इस्रायलला नष्ट करण्याचा विचार करत असतील, जिहाद्यांविषयी त्यांना सहानुभूती वाटत असेल, तर त्यांना अमेरिकेत घुसू देणार नाही. आम्हाला अशांची आवश्यकता नाही.

राष्ट्राध्यक्ष असतांना ट्रम्प यांनी काही इस्लामी आणि अन्य देशांतील नागरिकांवर घातली होती अमेरिकेत प्रवास करण्यावर बंदी !

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष असतांना वर्ष २०१७ मध्ये लिबिया, इराण, सोमालिया, सीरिया, येमेन आणि बहुसंख्य मुसलमान लोकसंख्या असलेल्या सर्व देशांतील लोकांच्या अमेरिकेतील प्रवासावर बंदी घातली होती. याखेरीज उत्तर कोरिया, व्हेनेझुएला, म्यानमार, किर्गिस्तान, नायजेरिया, टांझानिया, सुदान यांच्या नागरिकांवरही बंदी घालण्यात आली होती; मात्र जो बायडेन यांचे सरकार आल्यानंतर ही बंदी उठवण्यात आली.