क्षमा मागितल्यानंतर ‘ती झाली पाहिजे’, अशी त्याची (माणसाची) अपेक्षा असते. अपराधाचे परिणाम भोगावे लागू नयेत; म्हणून तो क्षमा मागण्याचा दंभ करत असतो, हे खरे सौजन्य नव्हे. ‘क्षमा मागण्याच्या मागील मूळ उद्देश क्षमा मिळवणे, हा नसून आपल्या अपराधाची जाणीव नम्रतापूर्वक व्यक्त करणे आणि पश्चात्ताप झाल्याचे दर्शवणे’, हा असतो.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘कर्मयोग’)