‘मडगाव (गोवा) येथील सां जुझे दि आरियाल या ठिकाणी डी फर्नांडिस (वय ३७ वर्षे) या युवकाने दारूच्या नशेत आक्रमक होऊन हाताचा ठोसा काचेच्या खिडकीवर मारल्यानंतर हाताची नस तुटल्याने त्याला जीव गमवावा लागला. यासंबंधी मायणा कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डी. फर्नांडिस याने दारूच्या नशेत आक्रमक होऊन हाताचा ठोसा घरातील काचेच्या खिडकीवर मारल्याने त्याच्या हाताची नस तुटून रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर त्याला मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली आणि हा घातपात नसल्याचे सांगितले.’ (४.१.२०२५)