‘एकदा मी रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आम्हाला पुढील अनुभूती आल्या.
१. कु. चैतन्य साटम या साधकाच्या वहीला चंदनाचा सुगंध आला.
२. सौ. नयना नाईक या साधिका सत्संगात बोलत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना मध्येच थांबवले आणि आम्हाला विचारले, ‘‘इतरांना आता काय वाटले ? कोणता सुगंध आला का ?’’ त्या वेळी आम्हाला चंदनाचा सुगंध बराच वेळ येत होता.’
– सौ. समृद्धी सचिन सनगरे, रत्नागिरी (१५.९.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |