सहजता आणि अल्प अहं असलेल्या बांदोडा, फोंडा येथील पू. (सौ.) ज्योती ढवळीकर (वय ६२ वर्षे) !

‘पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. (सौ.) ज्योती ढवळीकर

१. सहजता 

‘पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या समवेत सेवा करतांना त्यांच्यामधील ‘सहजता’ या गुणामुळे सेवेच्या ठिकाणी वातावरण आनंदमय होत असे आणि मला सेवा करतांना उत्साह वाटत असे.

२. साधकांना प्रेमाने चुका सांगणे 

सौ. स्नेहा नाडकर्णी

मी पू. (सौ.) ज्योतीताईंच्या समवेत ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या संबंधित सेवा करत होते. त्या वेळी त्या साधकांना प्रेमाने चुका सांगत असत. त्यामुळे साधकांना ताण न येता सेवेतून आनंद मिळत असे.

३. स्वीकारण्याची वृत्ती 

पू. ज्योतीताईंना सेवा करतांना काही नवीन सूत्रे सुचल्यास त्या ‘असे केले, तर चालेल का ?’, असे निरपेक्षपणे विचारत असत. त्या वेळी उत्तरदायी साधकाने त्यांना ‘नको’, असे सांगितल्यास त्या लगेच स्वीकारत असत.

४. संतसन्मान सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. मला ‘मुलाखत ऐकण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे’, असा निरोप मिळाला. मी तेथे गेल्यावर मला सभागृतील वातावरण प्रसन्न वाटत होते.

आ. नंतर काही वेळाने तेथे सौ. ज्योती ढवळीकर (आताच्या पू. (सौ.) ज्योती ढवळीकर) आणि सौ. लता ढवळीकर (सौ. ज्योती ढवळीकर यांच्या जाऊबाई, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६५ वर्षे) सभागृहात आल्या. तेव्हा त्यांना पाहून ‘आज सौ. ज्योतीताई संत झाल्या असतील’, असे मला वाटले.

इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या पू. (सौ.) ज्योतीताईंची मुलाखत घेत असतांना त्यांचे मधुर शब्द माझ्या कानी पडताच माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले. पू. (सौ.) ज्योतीताई बोलत असतांनाही माझी भावजागृती होत होती.

‘पू. ज्योतीताईंमधील गुण आमच्यामध्ये येण्यासाठी आमच्याकडून कठोर प्रयत्न करून घ्यावेत’, अशी मी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कळकळीची प्रार्थना करते. मला हा दिव्य सोहळा अनुभवायला दिल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. स्नेहा नाडकर्णी, फोंडा, गोवा. (२८.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक