साधिकेच्या कुटुंबाचा एक सदस्य बनलेली आणि सर्वांना आनंद देणारी ‘इलो’ !

‘इलो’ ही कुत्री २ मासांपेक्षा लहान असतांना आम्हाला मार्गात सापडली. फेब्रुवारी २०२३ मधे आम्ही ‘इलो’ हिला घरी आणले. इलोमुळे आमच्या कुटुंबात आनंदी वातावरण आहे.

डॉ. मिनू रतन

१. ‘इलो’चे कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी असलेले वेगळे नाते 

माझे यजमान श्री. रवि यांचे इलो हे आज्ञाधारक बाळ आहे. तिला त्यांच्या समवेत खेळायला पुष्कळ आवडते. माझी मोठी मुलगी डॉ. वर्तिका कोठिया हिच्याशी इलोचे भावंडाप्रमाणे नाते आहे. माझ्या लहान मुलीची संरक्षक आणि मालकीण असल्याप्रमाणे तिचे वागणे असते. माझ्याशी ती आईचे लक्ष वेधून घेणारे लहान बाळ असल्याप्रमाणे खेळते.

२. आमच्यापैकी कुणीही हातात प्रवासाची ‘बॅग’ घेऊन जातांना दिसले, तर तिला ते समजते.

३. साधक घरी आले असतांना त्यांच्याशी मैत्री असल्याप्रमाणे त्यांच्याजवळ जाऊन शांतपणे बसणे; मात्र घरी प्रतिदिन येणार्‍या अन्य व्यक्तींना पाहून अस्वस्थ होऊन भुंकणे 

डॉ. (सौ.) मिनू रतन यांनी पाळलेली ‘इलो’

एखादा साधक प्रथमच आमच्या घरी आला असला, तरी इलो त्याला पाहून भुंकत नाही. त्याच्याशी मैत्री असल्याप्रमाणे ती त्याच्याजवळ जाऊन बसते. असे अनेक वेळा घडले आहे. याउलट घरी प्रतिदिन येणारा धोबी, किराणामाल आणणारा मुलगा किंवा कौटुंबिक मित्र यांना पाहून ती अस्वस्थ होऊन भुंकते. ते गेल्यावर ती शांत होते.

४. कावळे आणि ‘इलो’ यांची मैत्री

काही कावळे आणि इलो यांची मैत्री आहे. कावळे आमच्या घराच्या खिडकीत येऊन बसतात. कावळ्यांना पिण्यासाठी पाणी ठेवलेले असते. त्यांचे पाणी पिऊन झाल्यावर ते खिडकीत घराच्या दिशेने तोंड करून बराच वेळ बसलेले असतात. इलो त्यांना उत्साहाने प्रतिसाद देते.

५. एखाद्या लहान मुलाप्रमाणे इलोला एकटे रहायला आवडत नाही. तिला अधिक वेळ एकटे ठेवल्यास ती पुष्कळ अस्वस्थ होते. 

६. इलोचे डोळे भावना प्रदर्शित करणारे आणि प्रेमळ आहेत’, असे मला वाटते.’

– डॉ. (सौ.) मिनू रतन (वय ६४ वर्षे), वागातोर, गोवा. (५.७.२०२३)