बिहार सरकार म्हणजे अस्तनीतील निखारा !

 

श्री. दुर्गेश परुळकर

‘बिहार सरकारने इस्लामी संस्कृती स्वीकारली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वर्ष २०२४ ची दिनदर्शिका सिद्ध करतांना हिंदु सणांच्या सुट्या न्यून करून मुसलमानांच्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत. मुसलमानबहुल भागांत असलेल्या विद्यालयांना साप्ताहिक सुटी रविवारी न देता शुक्रवारी देण्यात आली आहे. बिहार सरकारचा हा निर्णय लाचारी, मूर्खपणा आणि आत्मघातकीपणा यांचे निदर्शक आहे.

नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे जनता दल (संयुक्त) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. देशातील अनुभवी राजकीय नेते म्हणून ते ओळखले जातात. आज त्यांचे वय ७२ वर्षांचे आहे. तथापि त्यांना आपल्या देशाची संस्कृती, परंपरा, आपल्या देशाचा दैदीप्यमान इतिहास ठाऊक नसेल, तर त्यांना अशा मोठ्या पदावर विराजमान होण्याचा अधिकार आहे, असे म्हणता येणार नाही. जर त्यांना आपल्या देशाची सांस्कृतिक परंपरा, देशाचा दैदीप्यमान इतिहास ज्ञात असूनही त्यांनी २०२४ ची दिनदर्शिकेची निर्मिती करतांना ‘बिहार इस्लामिक रिपब्लिकन’ असल्याचे स्वीकारले असेल, तर ‘त्यांनी देशद्रोह केला’, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

१. सावरकरांच्या विचारांच्या जवळपासही नितीश यांचे विचार पोचू शकत नाहीत !

स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यार्थीदशेत होते, त्या वेळी त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी ‘वन्दे मातरम्’ हा लेख लिहिला होता. आज नितीश कुमार यांचे जेवढे वय ७२ आहे, त्याच्या अंकांची अदलाबदल जरी केली, तरी सावरकर त्याही वयापेक्षा लहान असतांना जे विचार मांडतात, त्या विचारांच्या जवळपासही सत्तरी ओलांडलेले बिहारचे मुख्यमंत्री जाऊ शकत नाहीत.

२. बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा आत्मघातकीपणा !

देशातील प्रत्येक नागरिकाला हिंदु संस्कृती आणि इतिहास यांविषयी अभिमान असला पाहिजे. स्वत्व आणि स्वाभिमान बाजूला टाकून इतर धर्माला अवाजवी महत्त्व देता येत नाही. विशेषत: ज्या धर्माच्या अनुयायांनी आपल्या देशात असंख्य रक्तपात घडवले, त्यांचे अवाजवी कोडकौतुक करता येणार नाही.

आपल्या देशातील केरळ, बंगाल, काश्मीर, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये इस्लामच्या अनुयायांनी घातलेला धुमाकूळ लक्षात घेता त्यांच्याविषयी अवाजवी आस्था दाखवणे आणि आपल्या (हिंदूंच्या) पारंपरिक अन् सांस्कृतिक सुट्यांची संख्या न्यून करणे, म्हणजे आपणहूनच आपली संस्कृती आणि धर्म यांवर बहिष्कार टाकल्यासारखे आहे. इतर धर्मातील लोकांविषयी आदर दाखवण्यासाठी आपला धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा बळी देणे आवश्यक नाही. जगातील कोणत्याही धर्माच्या अनुयायांनी स्वतःच्या धर्माकडे दुर्लक्ष करून इतरांच्या धर्माचा उदो उदो करण्यासाठी बिहारच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे निर्णय घेतल्याचे आणि तशी कृती करण्याचा आत्मघातकीपणा केला नाही.

३. बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे काम हे भारतमातेचा गळा घोटणारे

स्वातंत्र्यवीर सावरकर ‘वन्दे मातरम्’ या लेखात लिहितात, ‘‘भरतभूमीला मातृस्थानी मानण्याच्या अधिकाराचा अभिषेक एकट्या भारतियांवरच जगत्चालकाने केला आहे.’’ याचा अर्थ जगातील कोणताही देश आपल्या देशाला ‘मातृभूमी’ या नावाने संबोधत नाही. आपला देश मातेसमान आहे. या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या प्राणांचा बळी दिला, तरी मातृभूमीचे ऋण फिटणार नाही. बिहारचे मुख्यमंत्री या भारतमातेचे पुत्र आहेत. त्यांनी केलेले कार्य हे भारतमातेच्या ऋणातून मुक्त होण्याऐवजी भारतमातेचा गळा घोटण्याचे काम त्यांनी केले आहे.

४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले मातृभूमीचे गुणगान

जगातील कोणताही देश जन्माला आलेला नव्हता, त्या वेळी आपल्या देशाने सभ्यता आणि सुसंस्कृतता यांच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याचा मान संपादन केला. आपल्या मातृभूमीचे गुणगान गातांना सावरकर लिहितात, ‘‘आमची भूमाता वीर्यवानपुत्रांची जननी आहे, हे सिद्ध करण्यासाठी तिच्या वीर्यवान पुत्रांपैकी काहींचा नामनिर्देश करू लागलो, तरी हे चंद्रा आणि सूर्या तुमची तेजे फिकी पडतील; कारण वीरमातृत्वात ही भूमी मृत्यूलोकांतच काय; पण सूर्य अन् चंद्र लोकांत श्रेष्ठ ठरवली जाईल. इंग्लंड, अमेरिका, जपान, चीन इत्यादी अर्भकांशी तुलना करणे, यांत काहीच अर्थ नाही. ज्या वेळेला रोमचे नाव ऐकू येत नव्हते आणि ग्रीस देशात वस्तीही झाली नव्हती, तेव्हाही आर्यभूमी वीरप्रसवा आणि मानवी समाजाची अधिदेवता होती. इजिप्त, खल्डिया आणि असीरिया यांच्याही कित्येक शतके आधी आमच्या येथे मानवीजातीची उत्क्रांती तत्त्वांच्या आणि दर्शनांच्या सूत्रीकरणापर्यंत आलेली होती. सर्व जगात अत्यंत जुना असा ‘ऋग्वेद’ या भूमीत निर्माण झाला. तत्त्वज्ञानाला १० सहस्र वर्षांपूर्वी शोधून काढणारे वीर्यवान ऋषी जगावर इतरत्र कुठे आढळणार आहेत ?’’

असा गौरव करून सावरकर ऋषींच्या तपाने आणि त्यांच्या त्यामुळे पवित्र झालेल्या मातृभूमीला वंदन करतात. आपल्या मातृभूमीचे हे श्रेष्ठत्व आणि ऋषिमुनींचे महत्कार्य यांकडे जेव्हा एखादी व्यक्ती दुर्लक्ष करते, त्या वेळी ती कृतघ्न ठरतेच, याखेरीज त्या व्यक्तीच्या हातून संस्कृती आणि राष्ट्र द्रोह अशी महान पातके घडतात.

५. भरतभूमीचे श्रेष्ठत्व आणि त्यातून झालेले शोधकार्य

ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि सामवेद हे सारे वेद याच भूमीत निर्माण झाले. याच भूमीत ब्राह्मण आणि उपनिषदेही निर्माण झाली. व्यास, वसिष्ठ, विश्वामित्र, पराशर, अगस्ती, गौतम, कपिल, अत्रि आणि भारद्वाज अशा ऋषिमुनींची मांदियाळी या देशात जन्माला आली. भास्कराचार्य, आर्यभट, वराहमिहिर यांनी भूगोल, ज्योतिष आणि गणित या शास्त्रांचे शोध लावले. ‘दशांशाचा शोध’ या भूमीचा आहे. ‘गुरुत्वाकर्षणाचा शोध’ या भूमीचा आहे. ‘त्रिकोणमिती’ या भूमीत यज्ञवेदीतून उत्पन्न झाली.  सार्‍या जगाला हे ज्ञान आपल्या मातृभूमीने उदारहस्ते दिले आहे.

६. इस्लामची विकृती आणि हिंदु धर्माची संस्कृती यांतील भेद

याउलट इस्लाम धर्मियांनी आक्रमण करून या भूमीतील सर्वसामान्य जनतेला ठार मारले आहे, लुटमार आणि जाळपोळ केली आहे. स्त्रियांवर बलात्कार केले आहेत. त्यांच्या क्रौर्याला कोणत्याही प्रकारची सीमा नाही. ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) ही त्यांची घोषणा आहे. हिंदु संस्कृती ‘संपूर्ण वसुंधरा हे एक कुटुंब आहे’, अशी शिकवण देते. ‘जो अल्लाचा स्वीकार करणार नाही, त्याला स्वर्गात जागा नाही. तो नरकातच जाणार’, अशा प्रकारचे विकृत विचार हिंदु संस्कृतीत बसत नाहीत. हिंदु संस्कृती ज्ञानाला महत्त्व देते. मानवाच्या सेवेलाच ईश्वराची सेवा मानणारी हिंदु संस्कृती आहे. इस्लामचा अनुयायी हाच केवळ या भूतलावर जिवंत राहील. अन्य धर्मियांना जिवंत रहाण्याचा अधिकार इस्लाम धर्म देत नाही. इस्लाम इतर धर्मियांसमोर दोनच पर्याय ठेवतो. इस्लाम धर्माचा स्वीकार करा अन्यथा मरा.

हिंदु संस्कृती सर्वांना सुविद्य आणि सुसंस्कृत करण्यासाठी झटणारी आहे. दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणार्‍या संतांची मांदियाळी या देशात जन्माला आली. सर्व जग सुखी आणि आनंदात राहिले पाहिजे. ‘सर्वांना आरोग्य प्राप्त व्हावे, यासाठी प्रयत्नशील रहा’, अशी शिकवण देणारी संस्कृती या जगाच्या पाठीवर केवळ हिंदु संस्कृती आहे. वेदिक धर्म आपल्या मातृभूमीचा प्राण आहे. आपल्या मातृभूमीला जिवंत रहाण्यासाठी, तिचे स्वातंत्र्य अबाधित रहाण्यासाठी आपल्याला हिंदु संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा यांचा अभिमान बाळगलाच पाहिजे. हे विचार बाजूला सारून इतरांचे अस्तित्व त्यांच्या धर्म आणि संस्कृती यांच्यासह नष्ट करण्याचे ध्येय ज्या धर्माने आपल्या अनुयायांना दिले, त्या धर्मियांना संतुष्ट करण्यासाठी उचललेले प्रत्येक पाऊल अन् केलेली प्रत्येक कृती आपला समूळ नाश करणारी आहे.

७. मानवाच्या जन्माविषयी सावरकर यांनी सांगितलेली संकल्पना

सावरकर ‘वन्दे मातरम्’ या लेखात लिहितात, ‘‘ज्या नामोच्चाराने आम्ही आणि आमचा देश सदैव पावन होतील, असे आता एक नाव सांगतो, ते ऐका. हे जगातील सर्व प्राणीमात्र हो आणि स्वर्गातील सर्व देव हो, ते नाव श्री सीतादेवीचे होय. सीतादेवी या भूमीच्या उदरी जन्माला आली. ज्या भूमीच्या उदरी श्री जानकी जन्माला आली, त्या भूमीच्या उदरी आमचाही जन्म झाला आहे. ही कल्पना मनात प्रवेश करताच ते मन आकाशाहून विस्तृत करते.’’

८. …म्हणून बिहारचे सरकार अस्तनीतील निखारा आहे !

जी संस्कृती आणि धर्म यांमुळे मन आकाशापेक्षाही विशाल होते, त्या धर्माकडे पाठ फिरवून आपल्या धर्मापेक्षा वेगळ्या धर्माच्या अनुयायांना ‘काफिर’ म्हणून त्यांची हत्या करण्याची शिकवण जो धर्म देतो, त्याचा अनुनय करणे, म्हणजे आपणच आपल्या हाताने आपल्या प्रियतम मातृभूमीला तिच्या श्रेष्ठतम संस्कृतीसह नष्ट करण्याचा केलेला आततायीपणा आपल्याच नाशाला कारणीभूत ठरणार आहे. याचे भान दीर्घकाळ ज्यांनी समाजाचे नेतृत्व केले, त्यांना राहिले नसेल, तर ‘अशा नेत्यांना राष्ट्रनिष्ठ कसे संबोधावे ?’, हा प्रश्न आहे. यासमवेत ‘यांच्या हाती आपला देश, आपली संस्कृती आणि परंपरा सुरक्षित अन् अबाधित आहे’, असे आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकतो ? म्हणूनच असा आत्मघातकी निर्णय घेणारे बिहारचे सरकार अस्तनीतील निखारा आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (३०.११.२०२३)