प्रसिद्ध अब्दाधीश उद्योगपती मस्क यांनी केला इस्रायलचा दौरा
तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २७ नोव्हेंबरच्या सायंकाळी अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क इस्रायलला पोचले. या वेळी त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली. नेतान्याहू यांच्यासह चर्चा करतांना मस्क म्हणाले की, हमासला संपवण्याखेरीज दुसरा कोणताही मार्ग नाही. चर्चेच्या आधी नेतान्याहू यांनी मस्क यांना हमासने केलेल्या भयावह आक्रमणाचे व्हिडिओ दाखवले होते.
या वेळी मस्क म्हणाले की, आक्रमणकार्यांना संपवणे आवश्यक आहे. लोकांना खुनी होण्याचे प्रशिक्षण देणार्यांचा प्रचारही थांबला पाहिजे. गाझाच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचे आहे. मला गाझाच्या पुनर्बांधणीत साहाय्य करायचे आहे आणि युद्धानंतर त्यांना चांगले भविष्य द्यायचे आहे.
मस्क गाझा पट्टीमध्ये ‘स्टारलिंक इंटरनेट’ देणार !
या वेळी मस्क यांनी त्यांचे ‘स्टारलिंक ऑपरेशन्स’ आस्थापन आणि इस्रायलचे दूरसंचार मंत्रालय यांच्यात एक करार करण्यात आला. या अंतर्गत इलॉन मस्क स्टारलिंकच्या माध्यमातून इस्रायल आणि गाझा पट्टीमध्ये इंटरनेट सुविधा पुरवणार आहेत.