Javed Akhtar on Hindu Culture : हिंदु संस्कृतीमुळेच भारतातील लोकशाही टिकून आहे !

हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला हिंसक ठरवणार्‍या गीतकार जावेद अख्तर यांच्याकडून हिंदु संस्कृतीविषयी गौरवोद्गार !

मुंबई – काही मासांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्वनिष्ठ संघटनांची तुलना तालिबान्यांशी करून हिंदु राष्ट्र संकल्पनेलाही हिंसक ठरवणारे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात मात्र हिंदु संस्कृतीचे भरभरून कौतुक केले. ‘भारतातील लोकशाही हिंदु संस्कृतीमुळेच टिकून आहे’, असे गौरवोद्गार जावेद अख्तर यांनी हिंदु संस्कृतीविषयी काढले. मनसेच्या वतीने शिवाजी पार्क येथे आयोजित दीपोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर चित्रपट पटकथा लेखक सलीम खान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हेही उपस्थित होते.

रामायण भारतीय संस्कृतीचा वारसा !  

हिंदु संस्कृतीविषयी गौरवोद्गार काढतांना जावेद अख्तर पुढे म्हणाले, ‘‘रामायण हा भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. माझा जन्म श्रीराम आणि सीता यांच्या देशात झाला आहे. मी राम आणि सीता यांना केवळ हिंदूंचा वारसा समजत नाही. या देशातील प्रत्येक व्यक्तीची ती संपत्ती आहे. राम आणि सीता हे या देशातील सर्व नागरिकांचे दैवत आहे. भारतातील हिंदु संस्कृती सहिष्णु असल्याने या देशात लोकशाही टिकून आहे’’, असे सांगत त्यांनी ‘जय सियाराम’ची घोषणा देता उपस्थितांना घोषणा देण्यास सांगितले. (श्रीराममंदिराला विरोध करणार्‍यांना जावेद अख्तर यांनी कधी विरोध केला होता का ? काशी आणि मथुरा येथील हिंदूंच्या मंदिरांवर मुसलमानांनी नियंत्रण मिळवलेले आहे, त्याविषयी ते का बोलत नाहीत ? – संपादक)

(म्हणे) ‘हिंदूंमधील असहिष्णुता वाढत आहे !’

‘आम्हीच योग्य आहोत, अन्य चुकीचे आहेत’, हा दावा करणे हे हिंदु संस्कृतीचा भाग होऊ शकत नाही. आता मात्र असहिष्णुता वाढत आहे. (हिंदूंमधील असहिष्णुता वाढत आहे म्हणजे नेमके काय ? हे जावेद अख्तर यांनी स्पष्ट करावे. असे म्हणून अख्तर हिंदूंना हिंसक ठरवत आहे. हिंदूंनी धर्माच्या आधारावर हिंसा केल्याचे एकतरी उदाहरण जावेद अख्तर यांनी दाखवावे. – संपादक) ‘शोले’ चित्रपटामध्ये देवतेच्या मूर्तीच्या मागे उभा राहून प्रियकर ‘देव बोलत आहे’ असे भासवून प्रेयसीची फसवणूक करत असलेल्या या प्रसंगाला आता विरोध झाला असता. पूर्वी तसे होत नव्हते, असेही या वेळी जावेद अख्तर यांनी म्हटले.

(हा हिंदूंच्या देवतेचा अवमान आहे. पूर्वी हिंदु धर्माविषयीच्या अवमानाविषयी झोपलेले होते. आता ते जागे झाले आहेत आणि ते वैध मार्गाने विरोध करत आहे. याला जावेद अख्तर ‘असहिष्णुता’ म्हणत असतील, तर ते धर्माभिमानी हिंदूंचा विरोध करत आहे. हिंदु कधी अशा संदर्भात ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) करण्याची भाषा करत नाही, तरी त्यांना जावेद अख्तर असहिष्णु ठरवतात, तर स्वतःच्या धर्मबांधवांविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

काही मासांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी ‘ज्या पद्धतीने तालिबानी हे इस्लामी राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्या पद्धतीने आपल्याकडे काही जण हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडतात. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि तालिबान यांसारख्या संघटनांच्या ध्येयांमध्ये कोणताही भेद नाही. दोघांची मानसिकता समान आहे. या संघटनांच्या ध्येयाच्या मार्गात भारतीय राज्यघटना एक अडथळा बनत आहे; परंतु जर संधी मिळाली, तर ते घटनात्मक सीमाही ओलांडतील’, असे विधान अख्तर यांनी केले होते.

संपादकीय भूमिका

  • धर्मांध मुसलमानांमुळे देशाची काय स्थिती होत आहे, हेही जावेद अख्तर यांनी सांगायला हवे !
  • हिंदु राष्ट्राची संकल्पना ही हिंदु संस्कृतीवरच आधारित आहेत. एकीकडे हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला हिंसक ठरवायचे आणि दुसरीकडे ‘हिंदु संस्कृती सहिष्णु आहे’, असे म्हणायचे’, हा जावेद अख्तर यांचा संधीसाधूपणाच होय. जावेद अख्तर यांना खरोखरच हिंदु संस्कृतीचे महत्त्व समजले असेल, तर त्यांनी यापूर्वी हिंदु धर्माला हिंसक ठरवण्याविषयी केलेल्या वक्तव्याची सार्वजनिकरित्या क्षमा मागावी.