म्हैसांग (जिल्हा अकोला) येथील कचरू महाराज संस्थानात पाचव्यांदा चोरी !

अकार्यक्षम पोलीस प्रशासन !

अकोला – तालुक्यातील म्हैसांग येथील दर्यापूर मार्गावर पूर्णा नदी काठावर असलेले कचरू महाराज संस्थान येथे ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ चोरट्यांनी दानपेटी चोरली. गेल्या वर्षभरात ५ वेळा येथे चोरी झाली आहे.

चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाले आहेत. चोरांनी दानपेटी चोरून ती एका शेतात नेऊन फोडली आणि त्यातील रोख पळवली. या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना देण्यात आली. ‘या घटनेची तात्काळ चौकशी करून चोरट्यांना अटक करावी’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

एका संस्थानातील दानपेटीची पाचव्यांदा चोरी होत असतांनाही पोलीस यंत्रणा झोपा काढत होती का ? या संस्थांनात प्रथम चोरी झाल्यानंतर पोलिसांनी येथे पुन्हा चोरी होणार नाही, यासाठी उपाययोजना काढायला हवी होती. ती न काढल्यानेच असा प्रकार सतत होत आहे. यापुढे तो होणार नाही, याचीही शाश्‍वती देता येत नाही. जनता आणि तिच्या मालमत्तेचे रक्षण करू न शकणार्‍या अशा निष्क्रीय पोलीस यंत्रणेला जनतेच्या पैशातून पोसायचे कशाला ?