‘गो सेवा संघ रत्नागिरी’च्या वतीने वसुबारसनिमित्त गो पूजन, व्याख्यान आणि सत्कार सोहळा

रत्नागिरी, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – गो सेवा संघ रत्नागिरीच्या वतीने वसुबारसनिमित्त गो पूजन, व्याख्यान आणि सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, ९ नोव्हेंबर २०२३ या दिवशी सायंकाळी ७.०० वाजता कुवारबांव येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर करण्यात आले आहे.

आपल्या हिंदु धर्मात गोमातेला सर्वांत महत्त्वाचे स्थान असून समुद्र मंथनातून ५ कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातून नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशित ठेवून ‘अनेक जन्मांच्या कामनापूर्तीसाठी’ आणि ‘गायीच्या शरिरावर जेवढे केस आहेत, तेवढी वर्षे स्वर्गवास व्हावा’, यासाठी वसूबारस सण साजरा केला जातो. गोमाता निसर्ग आणि मानवी जीवनात अत्यंत उपयोगी आहे, असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे आणि म्हणूनच गोमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसूबारस या दिवशी हिंदु बांधवांना पूजा करता यावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

अधिक माहितीसाठी ९०२९९९६८४४ किंवा ९७३०३०५०७३ या भ्रमणभाष क्रमांकांवर संपर्क साधावा आणि या कार्यक्रमाचा सर्व हिंदु बंधू-भगिनी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘गो सेवा संघ रत्नागिरी’च्या वतीने करण्यात आले आहे.