पाकिस्तानी पोलीस आणि सैन्य अफगाणी शरणार्थींवर अत्याचार करत असल्याचे प्रकरण
काबुल (अफगाणिस्तान) – गेल्या महिन्यात पाकिस्तानी सरकारने पाकमध्ये अनधिकृतपणे रहाणार्या लाखो अफगाणी नागरिकांना १ नोव्हेंबरपर्यंत देश सोडून जाण्याचा आदेश दिला. यानंतर अनेक अफगाणी नागरिक पाक सोडून मायदेशी परतले. जे परतू शकलेले नाहीत, त्यांच्यावर पाकिस्तानी पोलीस अत्याचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानचा उप संरक्षण मंत्री महंमद याकूब मुजाहिद याने पाकला चेतावणी दिली. तो म्हणाला की, पाकने अफगाणी नागरिकांशी क्रूरतेने वागू नये, तसेच त्यांची वैयक्तिक मालमत्ता आणि वस्तू हिसकावून घेऊ नये, अन्यथा पाकला त्याचे परिणाम भोगावे लागतील.
१. मुजाहिद पुढे म्हणाला की, शरणार्थींच्या विरोधातील पाकच्या धोरणाचा दोन्ही देशांतील संबंधांवर नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे पाकने अफगाणिस्तानातील लोकांवर अत्याचार करण्यापूर्वी विचार करायला हवा. पाकिस्तान जे पेरेल, तेच उगवेल.
२. मुजाहिद याने या संपूर्ण प्रकरणात संयुक्त राष्ट्रांना हस्तक्षेप करण्याचे आवाहनही केले आहे.
संपादकीय भूमिकाएरव्ही मुसलमानेतरांवर आक्रमण करण्यासाठी जगभरातील मुसलमान एकत्र येतात; परंतु अन्य वेळी एकमेकांच्या जिवावर उठतात, हेच यावरून सिद्ध होते ! |