‘मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना त्या सेवा करत असलेल्या खोलीत भेेटण्याचा योग अनेक वेळा येतो. मला त्यांच्या खोलीविषयी काही विशेष सूत्रे अनुभवायला आली आणि त्यांच्या सत्संगात त्यांच्या संदर्भात अनुभूती आली.
१. रामनाथी (गोेवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाची स्थापना झाल्यावर आलेली अनुभूती
१ अ. महर्षींच्या आज्ञेने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी रामनाथी (गोेवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाची स्थापना करणे, त्यानंतर त्यांच्या खोलीत वेगळीच ऊर्जा जाणवून शरिरावर रोमांच येणे : १४.५.२०२१ या अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी धर्मध्वजाची स्थापना केली. त्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला मी त्यांच्या सेवेच्या खोलीत गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला ‘दोन मिनिटे डोळे बंद करून काय जाणवते ?’, असा प्रयोग करायला सांगितला. तेव्हा मला त्यांच्या खोलीत फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा जाणवून माझ्या शरिरावर रोमांच येत होते आणि माझी भावजागृती होत होती. मला त्यांच्या खोलीत सर्वत्र पिवळा प्रकाश जाणवत होता. मला सूक्ष्मातून दिसले, ‘त्यांच्या खोलीच्या वर १ आणि खाली १ अशी २ मोठी सुदर्शन चक्रे फिरत आहेत’ आणि ‘त्यांचे चैतन्य ब्रह्मांडात सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.
१ अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार ! : धर्मध्वज स्थापना विधीच्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे कौतुक करतांना परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘यापुढे इतिहासात सर्व ‘बिंदा-बिंदा’, असेच असणार आहे.’’ (म्हणजे सर्वत्र श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचेच नाव असणार आहे.)
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
२ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बसलेल्या आसंदीकडे पाहिल्यावर पांढरा प्रकाश दिसणे आणि डोळे मिटून आसंदीकडे पाहिल्यावर तेथे पांढरी वस्त्रे परिधान केलेले एक योगी दिसणे: श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील वातावरणातही पालट होतो. ‘खोलीत अधिक प्रमाणात ऊर्जा प्रवाहित होत आहे’, असे मला जाणवते. एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ परात्पर गुरु डॉक्टरांना भेटून गेल्यावर मी त्यांची आसंदी उचलून दुसरीकडे ठेवली. तेव्हा मला आसंदीवर पांढरा प्रकाश दिसत होता. त्यानंतर त्या आसंदीकडे डोळे मिटून पाहिल्यावर मला दिसले, ‘पांढरी वस्त्रे परिधान केलेले एक योगी त्यावर बसले आहेत.’ त्या आसंदीकडे पाहून माझी भावजागृती होत होती आणि माझे ध्यान लागत होते.’
– श्री. निमिष म्हात्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |